

लातूरच्या निलंगा बस डेपोमध्ये एसटी बसला अचानक भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. बस डेपोमधील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेल्यानंतर ही भीषण आग लागली. मात्र सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात भीषण आग. आज सायंकाळच्या सुमारास लागली जेवणाच्या कॅटर्सला आग. या आगीत गॅस सिलेंडरचे पाठोपाठ स्पोट. अकोट शहरातील अहिल्यादेवी होळकर नगरातील केटरर्सला ही आग लागली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.
2.8 रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
8 वाजून 19 मिनिटांनी जाणवला भूकंपाचा धक्का
रत्नागिरी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केद्र
भूकंपाचे धक्के नंतर कोणतीही हानी नाही.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपुर यांच्या नेतृत्वात छापा टाकण्यात आला. या कारवाईत कृषी विभागाच्या टीमने 100 बॅग बोगस युरिया जप्त केले. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना सब्सिडीत मिळणाऱ्या युरीयाचा इंडस्ट्रीयल कामासाठी उपयोग होत असल्याची प्राथमिक माहिती.
गडचिरोली नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे लागली भीषण आग
बाजूला असलेल्या राईस मिल च्या कर्मचाऱ्यांनी लावलेल्या आगीमुळे नगरपरिषदेचे लाखोंचे नुकसान
जळणाऱ्या कचऱ्याच्या धुरीमुळे देसाईगंज वासियांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
गडकोट महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी तुळजापूरमध्ये सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते आक्रमक झालेत.
मागील 24 ते 48 तासांमध्ये उत्तर कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट आलेली आहे. पुढील दोन दिवसात मुंबई आणि उत्तर कोकण भागात अति उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सध्या सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होताना पाहायला मिळते आहे. 13 14 आणि 15 मार्च रोजी दक्षिण महाराष्ट्र आणि राज्यातील काही भागातील विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता पुणे वेधशाळेनी वर्तवली आहे.
पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही, पुणे जिल्हा प्रशासनाने दिली माहिती
जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर देखरेख
नाशिकच्या मालेगावमध्ये आज पुन्हा तापमानात वाढ झाली आहे.
काल तापमान 39.4 अंशावर होते
आज त्यात पुन्हा वाढ झाली असून तापमान 39.6 अंशावर पोहचले
12.03.2026
कमाल तापमान--39.6
किमान तापमान -17.8
देवपुरातील रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या खुन खटल्यात माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारसह 11 जणांना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे, धुळ्यातील देवपुरात 8 जून 2018 रोजी रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पित्रा पुत्राची जमावाने निघृण हत्या केली होती, याचा निकाल आज धुळे न्यायालयाने दिला असून, तब्बल आठ वर्षानंतर न्यायालयाने दोशींना शिक्षा सुनावली आहे.
तळोदा तालुक्यातील हलालपूर येथे शेतात जखमी अवस्थेत बिबट्याचे बछडे आढळले...
उसाला आग लावल्यामुळे बिबट्याचे पिल्लू भाजल्याचा प्राथमिक अंदाज...
वनविभागाकडून जखमी बछड्यावर उपचार, परिसरात पेट्रोलिंग सुरू....
तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन.....
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बजेटला यंदा तब्बल आठ कोटी रुपयांची कात्री लावण्यात आली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा 34 कोटी आठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्वांधिक झुकतेमाप बांधकाम विभागालाच देण्यात आले आहे. तर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जिल्हा परिषद आवारात कॅन्टीन, गाळे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी अर्थसंकल्प जाहिर केला.
- बहुतांश जिल्ह्यांत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता
- नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन
- पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीममध्ये उष्णतेचा तडाखा
- नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही तापमान ४० अंशांच्या आसपास, उत्तर-पश्चिम वाऱ्यामुळे तापमानात वाढ
- अमरावती, वर्धा आणि अकोला जिल्ह्यांसाठी विशेष हिट-वे अलर्ट
कल्याणात अमेरिका–इराण युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीमुळे कल्याणमधील गुरुकृपा गॅस एजन्सी येथे सकाळपासूनच नागरिकांनी सिलेंडरसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मात्र वितरकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की सध्या फक्त व्यावसायिक कमर्शियल गॅस पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा बंद झालेला नाही. तरीही यापुढे गॅस सिलेंडर मिळणार नाही या भीतीने अनेक नागरिकांनी पॅनिक बुकिंग सुरू केली आहे.
आज ४ मिन ची सुनावणी झाली आणि ती महत्वाची गोष्ट वाटते कारण आमच्या आशा पल्लवीत झाल्या अशी प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टात आज शिवसेना धनुष्य बाण चिन्ह यावर सुनावणी झाली यावर सरोदे बोलत होते. पक्षांतर बंदी वर सुनावणी झाली पाहिजे एक विशिष्ट तारीख देण्यात येणार आहे तसेच दुपारी २ वाजता सुनावणी सुरुवात होईल आणि संध्याकाळपर्यंत चालेल आम्हाला अशा आहे की ही सुनावणी आता पुढे जाईल असं ही सरोदे म्हणाले.
- मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सादर केला अर्थसंकल्प
- सभेला विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती
- अर्थसंकल्पात विविध विभागांकरिता आर्थिक तरतूद
- मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाकरिता दहा टक्क्यांची राखीव तरतूद
- जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी, सातवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कसाठी आर्थिक तरतूद
- इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस परीक्षा फी करितादेखील तरतूद
- दिव्यांगाना स्कुटी वाटप तसेच दिव्यांग विद्यार्थिनीकरिता किसान विकासपत्र याकरिता देखील अर्थसंकल्पात तरतूद
- २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प २२ कोटी ५० लाखांचा तर २०२५-२६ चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प ३० कोटी ८० लाखांचा
मोठा स्फोट होऊन लागली आग
आग लागल्या मुळे पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांना देखील आग लागलेल्याची माहिती
आग लागल्यानंतर संपूर्ण धूर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर
धूर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
वाघोली, जगताप वस्ती रोडलगत रेडियन्स किचन अँड फर्निचर्स या कंपनीत आग
घटनास्थळी पीएमआरडीए व पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे चार अग्निशमन वाहने दाखल
आग विझवण्याचे काम सुरू आहे
क्रिकेटर हार्दिक पांड्या विरोधात पुण्यातील वकील वाजिद खान यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर सेलिब्रेशन वेळी हार्दिक पांड्या ने तिरंगा लावून त्याच्या गर्लफ्रेंड सोबत अश्लील कृत्य केलं तसेच अंगावर तिरंगा असताना हा तिरंग्याचा सुद्धा अपमान आहे असं वकील वाजिद खान यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे. पोलिसांनी लवकर या तक्रारीची दखल घ्यावी तसेच उद्या पांड्या विरोधात न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करणार असल्याची माहिती वकील वाजिद खान यांनी दिली आहे.
सोलापूर -
- सोलापूर महापालिका आयुक्तांच्या विरोधात नागरिकांची घोषणाबाजी
- महापालिकेने स्वतःच नाला नोंद केलेल्या नाल्याला नदीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरु आहेत
- जर अदीला नदी होती तर मग महापालिकेने आम्हाला बांधकाम परवाना का दिला? तसेच आमच्याकडून कर वसुल का केला.
- शहरातील वसंत विहार आणि बाळे परिसरातून जाणाऱ्या नाल्यावरून महापालिका आणि नागरिकांमध्ये मोठा वाद
क्रिकेटर हार्दिक पांड्या विरोधात पुण्यातील वकील वाजिद खान यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर सेलिब्रेशन वेळी हार्दिक पांड्या ने तिरंगा लावून त्याच्या गर्लफ्रेंड सोबत अश्लील कृत्य केलं
तसेच अंगावर तिरंगा असताना हा तिरंग्याचा सुद्धा अपमान आहे असं वकील वाजिद खान यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे.
पोलिसांनी लवकर या तक्रारीची दखल घ्यावी तसेच उद्या पांड्या विरोधात न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करणार असल्याची माहिती वकील वाजिद खान यांनी दिली आहे.
मालेगाव -
- मालेगावात दुसऱ्या दिवशीही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
- सिलेंडर घेण्यासाठी मालेगावात सकाळपासूनच रांगा
- गॅस भेटणार नाही या भीतीने लोकांची झुंबड
- महसूल प्रशासन गॅस वितरण व्यवस्थेकडे लक्ष ठेवून
- तहसिलदारांकडून थेट गर्दी होत असलेल्या गॅस वितरकांच्या भेटी
- तहसिलदारांकडून गॅस वितरकांना योग्य नियोजन करण्याच्या सूचना
- सर्वांना घरगुती गॅस मिळेल लोकांनी घाबरून जाऊ नये महसूल प्रशासनाचे आवाहन
- गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे आश्वासन
- सर्व्हर डाऊन असल्याचा फटका ग्राहक नोंदणीला बसत आल्याने अडचणीत वाढ
रायगड -
- रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता राष्ट्रवादीचे 16 सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
- माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचे स्वागत
- भगवे फेटे बांधून सर्व सदस्य अलिबाग मधील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
- थोड्याच वेळाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची अधिकृत घोषणा होणार
- महायुतीचे प्रमुख पदाधिकारी अलिबागमध्ये दाखल
रायगड -
- रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध
- रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा
- अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील बिनविरोध
- निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली घोषणा
- निवडणूक निकालानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
रत्नागिरी - गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा फटका कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानाला
गणपतीपुळे देवस्थानामध्ये मिळणारा लाडूचा प्रसाद झाला बंद
गॅस सिलेंडरच्या तुटवडामुळे लाडू प्रसाद केला गेला बंद
सिलिंडर न मिळाल्यास खिचडी प्रसाद देखील करावा लागणार बंद
आणखीन दोन ते तीनच दिवस खिचडी प्रसाद बनेल इतकाच गॅस उपलब्ध
एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला
इराण इजराइल आणि अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा मोठा फटका आता गडचिरोली शहराला देखील बसू लागला आहे.
जळगाव -
नागपूर मुंबई महामार्गावर जळगावात हरताळा फाटा इथं एका कारने चौघांना उडवल्याची घटना घडलीय.
राँग साइडने आलेल्या कारनं धडक दिल्यानं चौघेही गंभीर जखमी झाले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या कारला दोन नंबर प्लेट आहेत.
अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. जखमींवर उपचार सुरू आहे
मध्य रेल्वे चालवणार उन्हाळी सुट्टी मध्ये विशेष गाड्या
मध्य रेल्वे कडून 1484 उन्हाळी विशेष गाड्या चालवायची घोषणा
महाराष्ट्रातील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई/दौंड - सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड - बडनेरा आणि हडपसर-हरंगुळ दरम्यानच्या गाड्यांचा समावेश
ठाणे -
ठाण्यात कारला अपघात
चालकाचा कारवरील ताबा सुटला
कार डिव्हायडरला धडकून अपघात
ठाण्यातील कळवा परिसरातील 90 फीट रोडवरील घटना
अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी
गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी
लांबच लांब रांगा, पोलिस बंदोबस्तात गॅस वाटप
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी
गॅस वितरक आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक चकमक
अनुचित प्रकार टाकण्यासाठी पोलिस बंदोबस्तात गॅस वितरण
धाराशिवमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरीकांनी सकाळपासूनच गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे.दोन दिवसापुर्वी ज्यांनी बुकींग केली अशा नागरीकांना सिलेंडर वितरण केल जात आहे माञ ज्यांना आज बुकींग करायच आहे त्यांची बुकींग होत नसल्याने नागरिकांतुन संताप व्यक्त केला जातोय
- घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल
- पंढरपुरातील सांगोला नाका येथे अवैध पद्धतीने घरगुती गॅस हा रिक्षात भरून विक्री केली जात होती
- जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत घरगुती गॅसच्या 8 तर व्यावसायिक वापराच्या 5 टाक्या जप्त करण्यात आल्यात
- गणेश बोरीकर यांच्या विरोधात पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
- त्याचबरोबरीने त्याला गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीचा शोध भरारी पथक घेत आहे
- अवैध पद्धतीने गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर देखील अशाच पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले
- अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सात नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आखाती देशातील युद्धाचा परिणाम लहान मोठ्या उद्योगाना देखील बसतोय.सोलापुरातील महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड युद्धजन्य परिस्थितीमुळे गोडाऊनमध्येच पडून आहेत.या पापड उद्योग समुहाच्या माध्यमातून जवळपास 6 हजार महिला काम करतात.रमजान महिन्यात आखाती देशातून विशेषतः दुबईतून मोठी मागणी पापडसाठी असते.काही व्यापाऱ्यांनी पापडसाठी आधीच ऑर्डर दिली होती.त्यामुळे जवळपास 2 कोटींचा पापड पॅकिंग करून तयार आहे. मात्र युद्धमुळे एक्स्पोर्ट बंद असल्याने एक्स्पोर्टर आता फोन ही उचलायला तयार नाही. त्यामुळे या कोट्यावधी रुपयांच्या पापडचे करायचे काय? असा सवाल या उद्योगासमोर आहे.
गॅसच्या शेगडीवरून हळूहळू स्वयंपाक आता चुलीवर केला जातोय. संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल चालक गॅस ऐवजी लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळले आहेत. त्यामुळं आता लाकडांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही वाढू लागलेत. चार पाच किलोने मिळणारा लाकूड आता आठ तर १२ रुपये किलोने मिळू लागला आहे.
कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू
कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील गॅस वितरण केंद्रासमोर नागरिकांची भली मोठी गर्दी
गॅस वितरण करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त
उन्हाचे चटके सोसत अनेक नागरिक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन उभे आहेत रांगेत
घरगुती गॅसवर धावणारी 80 वाहने जप्त नंदुरबार जिल्ह्यात आरटीओची मोठी कारवाई
वाहनांमध्ये एलपीजी सिलिंडरचा बेकायदेशीर वापर उघड विशेष तपासणी मोहिमेत कारवाई
घरगुती गॅसचा वाहनांमध्ये वापर केल्यास कठोर कारवाईचा इशारा
गॅसच्या काळाबाजारावर लगाम घालण्यासाठी प्रशासनाचे पाऊल
देशभरात जाणवणाऱ्या एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या तुटवड्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज संसदेच्या आवारात आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी या आंदोलनात सहभागी झाले होते. सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड या महाराष्ट्रातील खासदारही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम नवी मुंबई शहरात दिसून आला असून रात्री आणि पहाटेपासून घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर भलीमोठी रांग लावल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा
हॉटेल चालकांकडून कोळशाच्या भट्टीवर स्वयंपाक
हॉटेल व्यवसायिकाकडून गॅसच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणून भट्टीवर स्वयंपाक
हॉटेल व्यवसायाला युद्धाचा मोठा फटका
गॅस नसल्याने अनेक हॉटेल्स बंद
तर अनेक जणांकडून पर्यायी व्यवस्था उभी करून स्वयंपाक
येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोळशाचा भट्टीवर स्वयंपाक
इराण - इस्त्राईल युद्धामुळे मंगल कार्यालय व कॅटरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे.कारण व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाला.त्यामुळे जेमतेम दोन लग्न निघू शकेल एवढाच गॅस साठा आता मंगल कार्यालय व्यावसायिकांकडे आहे.त्यानंतर मात्र मोठी समस्या निर्माण होणार आहे. झाली विशेष म्हणजे पुढच्या काळात लग्न सराई मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे ऑर्डर कशी करावी समस्या निर्माण झाली आहे.एक तर गॅस अभावी लग्न पुढे ढकलावे लाग…
आज सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरातील गॅस वितरण केंद्रांवर नागरिकांची तुफान गर्दी
पहाटेपासून नागरिकांनी गॅस वितरण केंद्रासमोर केली आहे गर्दी
एका एका केंद्रासमोर चारशे ते पाचशे नागरिक रांगेत गॅस घेऊन उभे
शासनाच्या वतीने गॅस घेण्यासाठी राबवण्यात येणारी किचकट प्रणाली थांबून सर्वांना गॅस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी
उन्हाच्या झळा सोसत नागरिक उभे आहेत गॅस घेण्यासाठी रांगे
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वाण नदीपात्रात रिंगणवाडी, वानखेड, काटेल, कोलद व काकनवाडा परिसरात दिवसाढवळ्या अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिवसेना किसान सेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे यांनी केला आहे. तसेच पेसोडा येथील पूर्णा नदीपात्रात बोट व केनी मशीनच्या सहाय्याने, तर पांडव नदीपात्रातील पळशी झांसी, उमरा व पंचाळा परिसरात जेसीबीद्वारे दिवसरात्र वाळू व रुडीचे उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदार, संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत अमोल ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला
भाजपचे मंगेश रामचंद्र वाकडीकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली उमेदवारी
रायगडच्या पेन मधील केळवणे मतदार संघातून निवडून आलेले मंगेश वाकडीकर यांना संधी
अध्यक्षपदासाठी प्रस्थापित अनेक चेहरे असताना मंगेश वाकडीकर या सर्वसामान्याला संधी दिल्यामुळे अनेकांची संधी हुकली..
आज रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित..
उपाध्यक्षपदाची अद्याप घोषणा नाही......
आखाती देशातील युद्धाचा परिणाम लहान मोठ्या उद्योगाना देखील बसतोय.सोलापुरातील महालक्ष्मी महिला पापड उद्योगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले तब्बल 2 कोटी रुपयांचे पापड युद्धजन्य परिस्थितीमुळे गोडाऊनमध्येच पडून आहेत.या पापड उद्योग समुहाच्या माध्यमातून जवळपास 6 हजार महिला काम करतात.रमजान महिन्यात आखाती देशातून विशेषतः दुबईतून मोठी मागणी पापडसाठी असते.काही व्यापाऱ्यांनी पापडसाठी आधीच ऑर्डर दिली होती.त्यामुळे जवळपास 2 कोटींचा पापड पॅकिंग करून तयार आहे. मात्र युद्धमुळे एक्स्पोर्ट बंद असल्याने एक्स्पोर्टर आता फोन ही उचलायला तयार नाही. त्यामुळे या कोट्यावधी रुपयांच्या पापडचे करायचे काय? असा सवाल या उद्योगासमोर आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कमर्शियल गॅसचा तुटवडा
हॉटेल व्यवसायिकांसह अनेक उद्योग अडचणीत
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टला देखील गॅस पुरवठ्याची अडचण
केवळ दोनच दिवस पुरेल इतका गॅस साठा
श्री महालक्ष्मी अन्नछत्रात राज्यभरातील चार ते पाच हजार भाविक घेतात रोज अन्नाचा लाभ
अन्नछत्राला गॅस पुरवठा करावा अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
रायगडमध्ये बेमोसम धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी रायगडला कडक उन्हाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि आज थंडी नसताना दाट धुक पसरल आहे. निसर्गाच्या या लहरी पणाच सर्वांना अश्चर्य वाटत आहे.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील गटातील तीन पंचायत समिती सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय खेळी यशस्वी सांगोल्याच्या इतिहासात पहिल्यांदा होणार भाजपचा सभापती
आज सांगोला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची होणार निवड....
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी सांगोल्यातील महायुतीच्या प्रमुख नेते यांची समन्वय बैठक
या बैठकीत सांगोला पंचायत समितीच्या सभापती पदाची पहिली संधी भारतीय जनता पक्षाला देण्याचा सर्वानुमते निर्णय
जवळा पंचायत समिती गणातील पूनम इंगवले या भाजपच्या पहिल्या सभापती होण्याचा मान मिळवणार असल्याची माहिती तर नाझरे गणातून विजयी झालेले शिवसेनेचे अजय सरगर हे उपसभापती म्हणून विराजमान होणार असल्याचे निश्चित
केंद्र सरकारच्या महत्वकांशी प्रधानमंत्री धन- धान्य कृषी योजनेसाठी महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला विशेष स्थान मिळाले आहे या योजनेच्या माध्यमातून पुढील सहा वर्षात जिल्ह्यातील शेतीचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.साडेतीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे आर्थिक बळ दिले जाणार आहे.
लातूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे., वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, शहरातील प्रमुख चौकांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी "फ्री लेफ्ट टर्न" संकल्पना राबवण्यात येईल, अनाधिकृत पार्किंग वर कारवाई करण्यात येईल, आणि रस्त्यावरील संकेतचिन्ह ,झेब्रा क्रॉसिंग यांचे नूतनीकरण करण्यात येईल असे महत्त्वाचे निर्णय या समितीच्या बैठकीत पार पडले आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविक मारहाण प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू
चौकशीचा कल भारतीय संविधानाच्या ‘आर्टिकल १५’ उल्लंघनाकडे
भाविकाला दर्शनापासून रोखणे म्हणजे धार्मिक स्थळी प्रवेश नाकारणे, या दृष्टीने तपास सुरू
व्हीआयपी दर्शन पासमध्ये घोटाळ्याचा झाल्याचा चौकशी अधिकाऱ्यांना संशय
तीन महिन्यांचे CCTV फुटेज आणि लेजर बुक चौकशी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले
काच पासवर अनेकांना प्रवेश दिला का? चौकशी अधिकाऱ्यांकडून तपास सुरू
देवस्थान, पुजारी, अधिकारी यांच्या माध्यमातून पासशिवाय प्रवेशाच दिला जात असल्याचा संशय
VIP पासमुळे देवस्थानच्या उत्पन्नात येणारा पैसा दुसऱ्या कुणाच्या खिशात जातोय का? तपास सुरू
पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या
आमदार रोहित पवारांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
पुण्यातील रिंग रोड, तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग, पुणे शिरूर उन्नत महामार्गाला अजित पवारांचे नाव द्या
आमदार रोहित पवाराने नितीन गडकरींची भेट घेऊन केलीनाव देण्याची मागणी
धाराशिव मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली तीन दिवसापासून अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे.अजित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे.त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करण्यात यावेत तसेच या दुर्घटनेस कारणीभूत असणाऱ्या VSR कंपनीवर देखील कारवाही करून दुर्घटनेची निःपक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे.
पुढील दोन दिवस उन्हाचा कडका,विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान 40 पार जाण्याची शक्यता.
पुढील दोन दिवस उन्हाचा कडका,विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान 40 पार जाण्याची शक्यता
तर 13 ते 15 मार्च दरम्यान मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता
विदर्भासाठी पावसाचा येलो अलर्ट... हवामान विभागाचा इशारा
फळ बागांचे आणि उन्हाळी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता
बाईट एस. डी. सानप,हवामान विभाग
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक ॲक्शन मोडवर आलेले आहेत त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय वनविभागाकडून घेतले जात आहेत अशाच प्रकारे सभागृहामध्ये बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी वनविभागाच्या भविष्यातील योजना आणि निधी उपलब्धतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे नमूद करत, त्यांनी विविध प्रकल्पांसाठी सुमारे १४,००० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे जाहीर केले.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रात्री अचानक अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीला भेट देत सोमवारी भीषण आग लागलेल्या श्री गणेश केमिकल कंपनीची पाहणी केली. यावेळी अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचं फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट झालं आहे की नाही, याचा अहवाल ८ दिवसात सादर करण्याचे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.शहरात सलग दुसऱ्या दिवशी दोन गट आमने सामने येत तुफान दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी गोळीबार झाल्याच्या चर्चा सुरू असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भर चौकात उघडपणे दगडफेक होत असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्येही मोठी चिंता पसरली आहे.सलग दुसऱ्या दिवशी शहरात अशा प्रकारे दगडफेक होत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच दोन गट आमनेसामने येत दगडफेक करत असतील तर पोलिसांचा धाक उरला आहे का,असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
अंबरनाथ शहरात सध्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल्समध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक हॉटेल मालकांना आपल्या हॉटेलचा मेनू अर्धा करावा लागला असून काही पदार्थ देणे बंद करण्यात आले आहे. ग्राहकांचीही गैरसोय होत असून व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून संबंधित गॅस वितरक आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
मिकल कंपन्यांकडून मानवी वस्तीचं संरक्षण झालं पाहिजे, ही आमची भूमिका असून काही इंडस्ट्री जाणीवपूर्वक काही करत असतील, तर एमआयडीसी त्यांच्यावर कारवाई करेल. तसंच इन्शुरन्ससाठी आगी लावण्याचा प्रकार होत असेल, तर आहे त्यापेक्षाही अधिक कडक कारवाई करू, असा इशारा यावेळी उदय सामंत यांनी दिला. तर सामंत यांना व्यवस्थित माहिती देण्यास अधिकारी कमी पडल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांची माहिती नसणं ही शोकांतिका असल्याचं उदय सामंत त्यांनी म्हटलं. अधिकारी किती सजग आहेत, ते पाहण्यासाठीच मी इतक्या रात्री आलो असून भविष्यात लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी योग्य माहिती दिली पाहिजे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनाही योग्य माहिती असली पाहिजे, असे खडे बोल त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. उद्योगमंत्र्यांनी अचानक केलेल्या या पाहणी दौऱ्यामुळे अधिकारी मात्र चांगलेच कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.