Santosh Chordiya Passed Away
Santosh Chordiya Passed AwaySaam Tv

Santosh Chordiya Dies: मराठी विनोदी अभिनेता हरपला, हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन

Santosh Chordiya Death: प्रसिद्ध अभिनेते, स्टँड-अप कॉमेडियन आणि विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे.
Published on

Santosh Chordiya Passed Away

मराठी मनोरंजन विश्वावर आघात करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, स्टँड-अप कॉमेडियन आणि विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या अवघ्या ५७व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (१३ डिसेंबर) सकाळी निधन झाले आहे. (Pune News)

Santosh Chordiya Passed Away
Salman Khan: सलमान खानच्या मेकअप आर्टिस्टला दगड आणि रॉडने बेदम मारहाण, नेमकं कारण काय?

आपल्या विनोदी आणि एकपात्री प्रयोगामुळे त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. नाटक, दुरचित्रवाणी आणि चित्रपट अशा तिनही विभागांमध्ये त्यांनी जवळपास ३८ वर्ष काम केले. 'दुसरी गोष्ट' , 'कँपँचिनो', ' दगडाबाईची चाळ' , 'प्रेमा', 'सरगम' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अलीकडेच संतोष यांना विनोदोत्तम फाऊंडेशनतर्फे 'विनोद वीर' पुरस्काराने गौरवित केले. (Marathi Film)

संतोष चोरडिया यांनी अभिनयाप्रमाणेच सामाजिक कार्यातही मोलाची कामगिरी केली आहे. कर्करोगग्रस्त, मूक, अनाथ आणि एचआयव्ही ग्रस्त लोकांसाठी त्यांनी काम केले आहे. त्यांना 'हास्यसम्राट' पदवी देत गौरविण्यात आले होते. संतोष चोरडिया यांनी २०२१ मध्ये ‘रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन’ची स्थापना केली होती. त्या संस्थेचे चोरडिया स्वत: संस्थापक अध्यक्ष होते.

Santosh Chordiya Passed Away
Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात साहिल खानच्या अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

‘रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून भारतीय संगीत, नाटक, लोककला, शास्त्रीय नृत्य कला क्षेत्रामध्ये नवोदित चेहऱ्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून चोरडिया यांनी त्या संस्थेची स्थापना केली होती. चोरडिया यांच्या निधनाने एक हरहुन्नरी कलाकार आपण गमावला म्हणून हळहळ व्यक्त केली जात आहे. चोरडिया यांच्या पश्चात भाऊ, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. (Entertainment News)

Santosh Chordiya Passed Away
Gautami Patil: आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत, गौतमी पाटीलचा रोख कोणाकडे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com