Cancer Health : धुम्रपान न करता देखील होऊ शकतो कर्करोग? फुफ्फुसांवर कसा होतो परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Risk Of Cancer Cigarettes : जगभरात नोव्हेंबर महिना 'फुफ्फुसाचा कर्करोग जागृती महिना' म्हणून पाळला जातो. धूम्रपान हे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. फुफ्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे 80 टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात.
Cancer Health
Cancer HealthSaam Tv
Published On

Smoking Side Effects :

जगभरात नोव्हेंबर महिना 'फुफ्फुसाचा कर्करोग जागृती महिना' म्हणून पाळला जातो. धूम्रपान हे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. फुफ्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे 80 टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात.

सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 15 ते 30 टक्क्यांहून अधिक असते. धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो. कारण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात देखील थेट तंबाखूचा धूर जात असतो. एका सर्वेक्षणानुसार जगातील प्रत्येक चौथी व्यक्ती दुसऱ्याने केलेल्या धूम्रपानाचा बळी ठरत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्लोबोकॉनच्या 2018च्या अहवालानुसार, जगभरात 2018 मध्ये 18.1 दशलक्ष नव्या कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9.6 दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्करोगात सर्वाधिक प्रमाण म्हणजे 11.6 टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहे.

या रोगाच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक, 18.4 टक्के आहे. पहिल्या टप्प्यात हा कर्करोग फुफ्फुसांमध्ये आढळतो परंतु शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केल्याने रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या टप्प्यात, लिम्फ नोड्ससह फुफ्फुसांमध्ये हा कर्करोग (Cancer) पसरल्याचे दिसून येतो.

Cancer Health
Blood Sugar सतत वाढते? Diabetes च्या रुग्णांनी हिवाळ्यात या चुका करुच नका

डॉ रविकुमार वाटेगावकर (मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, टीजीएच-आँन्को लाईफ कँन्सर सेंटर पुणे) सांगतात की फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एकदा निदान झाल्यावर, या रोगाचा किती प्रसार झाला हे शोधणे महत्वाचे असते.

यासाठी, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या अवस्थेचे मूल्यांकन केले जाते आणि हा रोग कोणत्या टप्प्यात आहे, हे लक्षात आल्यावर त्याआधारे उपचारपद्धतीचे नियोजन करण्यात येते. कर्करोगाचा प्रकार, ट्यूमरचा आकार, तो किती प्रमाणात पसरला आणि रुग्णाची स्थिती यावर हे उपचार अवलंबून असतात.

Cancer Health
Zinc Rich Food : झिंकच्या कमतरतेमुळे शरीरावर होतोय परिणाम, आजच आहारात या पदार्थांचा समावेश करा

डॉ वाटेगावकर पुढे सांगतात की फुफ्फुसाच्या कर्करोगाची दोन प्रकारे विभागणी करण्यात येते स्मॉल सेल आणि नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसांचा कर्करोग. नॉन-स्मॉल सेल फुफ्फुस कर्करोगाचे चार मुख्य टप्पे आहेत.

पहिल्या टप्प्यात कर्करोग फुफ्फुसात आढळतो, परंतु तो फुफ्फुसांच्या बाहेर पसरत नाही. कर्करोग फुफ्फुसात व जवळच्या नोड्समध्ये आढळतो, तेव्हा त्यास दुसऱा टप्पा असे म्हटले जाते आणि जेव्हा कर्करोग छातीच्या मध्यभागी फुफ्फुसात आणि लिम्फ नोड्समध्ये असतो, तेव्हा त्याला तिसरा टप्पा म्हणतात. शेवटच्या, म्हणजे चौथ्या टप्प्यात कर्करोग दोन्ही फुफ्फुसांमध्ये, फुफ्फुसांच्या आसपासच्या भागात किंवा दूरच्या अवयवांमध्ये पसरतो.

स्मॉल सेल फुफ्फुसांच्या कर्करोगाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. कर्करोग फक्त एका फुफ्फुसात किंवा त्याच बाजुच्या जवळच्या लिम्फ नोड्समध्ये मर्यादीत प्रमाणात आढळतो; तर विस्तृत टप्प्यात, कर्करोगाचा प्रसार हा एका फुफ्फुसात संपूर्णपणे, तसेच उलट बाजूच्या फुफ्फुसात, उलट बाजूच्या लिम्फ नोड्सपर्यंत फुफ्फुस द्रवापर्यंत आणि दूरच्या अवयवांमध्ये व बोन मॅरोमध्ये होतो.

Cancer Health
Pregnancy Tips : वयाची तिशी ओलांडल्यानंतर गरोदरपणात कशी घ्याल काळजी? मधुमेह- रक्तदाबाची लक्षणे कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

पहिल्या टप्प्यात असलेला नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसाचा कर्करोग आढळल्यास, शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार करावा लागतो. त्यामध्ये फुफ्फुस आणि लिम्फ नोड्सचा प्रभावित झालेला भाग काढून टाकण्यात येतो. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात असलेल्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी हे उपचार एकत्रपणे करण्याची आवश्यकता निर्माण होते. तसेच शस्त्रक्रियेतही फुफ्फुसाचा कर्करोगग्रस्त भाग किंवा संपूर्ण फुफ्फुस व रोगग्रस्त लिम्फ नोड्स हे भाग काढून टाकावे लागतात. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील कर्करोगासाठी अन्य उपचार करणे अतिशय अवघड असते, तेथे इम्युनोथेरपी उपचारपद्धती (Treatment) यांचा वापर करण्यात येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com