Blood Sugar सतत वाढते? Diabetes च्या रुग्णांनी हिवाळ्यात या चुका करुच नका

How To Control Blood Sugar : वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच नियमितपणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे की, नाही हे देखील तपासावे लागते.
How To Control Blood Sugar
How To Control Blood SugarSaam Tv
Published On

Diabetes Health :

हिवाळा म्हटलं की, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होते. वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच नियमितपणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आहे की, नाही हे देखील तपासावे लागते.

रक्तातील वाढणारी साखरेच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम वाईट होऊ शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्य बिघडते. परंतु, हिवाळ्यात सतत भूक लागत असल्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण राहात नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अशावेळी कोणत्या चुका करु नये हे जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. शारीरिक व्यायाम

बरेचदा आपण अधिक शारीरिकरित्या सक्रीय नसतो. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर (Health) त्याचा परिणाम होतो. शरीराची पुरेशी हालचाल न केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यासाठी मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांनी दररोज चालणे, जॉगिंग करणे किंवा योगासने अधिक चांगले.

How To Control Blood Sugar
Yoga Tips For High BP : हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही योगासने करा, जाणून घ्या सविस्तर

2. पुरेशा प्रमाणात फायबरचे सेवन

आरोग्यासाठी फायबर अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे. फायबरच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखरेवर (Sugar) नियंत्रण ठेवता येते. यासाठी आहारात संपूर्ण धान्य, फळे, सुका मेवा, भाज्या यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे वजनही आटोक्यात राहिल.

3. प्रक्रिया केलेले पदार्थ

पॅक केलेले मांस, केचअप, कॉर्नफ्लेक्स आणि बिस्किटे यांसारख्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण असते. यासाठी प्रोसेड फूड खाणे टाळा यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यात असणारे अनावश्यक साखर आणि मीठ आरोग्यासाठी घातक असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com