रेशीमगाठीने दिली एचआयव्ही बाधित जोडप्यांना जगण्याची 'नवी उमेद'..!

बीडमध्ये एचआयव्ही बाधित 11 जोडप्यांना एकत्र आणून सामूहिक विवाह सोहळा घडवून आणल्याने, एचआयव्ही बाधितांना आधार मिळाला आहे.
एचआयव्ही बाधित जोडपे
एचआयव्ही बाधित जोडपे विनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड - एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं. माञ, बीडमध्ये अशा 11 जोडप्यांना एकत्र आणून सामूहिक विवाह सोहळा घडवून आणल्याने, एचआयव्ही बाधितांना आधार मिळाला आहे. Reshimgathi gives new hope to HIV-infected couples to live

एचआयव्ही संसर्गानंतर जीवनात निराश न होता. जातीच्या उतरंडी ओलांडून एचआयव्ही बाधित जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. कोरोनामुळे मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने, नव्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगण्याची उमेद घेऊन या नवविवाहित दाम्पत्यांनी वैवाहिक जीवनाला सुरुवात केलीय.

हे देखील पहा -

हेल्थ केअर कम्युनिटी ऑफ पॉझिटिव्ह पिपल्सच्या विहान प्रकल्पाने, जुळून येती रेशीमगाठी या उपक्रमांतर्गत बीड शहरात हा विवाह सोहळा पार पाडला आहे. सर्वधर्मीय या विवाह सोहळ्यात जातीच्या सीमा ओलांडून, वधुवर सहभागी झाले होते.

एचआयव्ही बाधित जोडपे
यवतमाळमध्ये रानटी जनावरांचा धुमाकूळ !

जीवघेण्या आजाराने बाधित असले तरी जगण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा या नवं दाम्पत्यांमध्ये कायम होता.

दरम्यान या अकरा जोडप्यांचं कन्यादान जिल्हा शल्य चिकित्सक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. एचआयव्ही बाधितांना समाजाने स्वीकारावे असा संदेश या विवाह सोहळ्यातून देण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com