मुंबई: 'ओंकार भोजने' हे नाव उद्गारल्यावर आपल्या चेहऱ्यासमोर येतो तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील 'कोकण कोहिनूर'. 'अगं अगं आई….' म्हणत स्वत:च्या खास शैलीत प्रेक्षकांना हसवणारा ओंकार काही काळातच नावारुपाला आला.
ज्या मालिकेने त्याला प्रसिद्ध केले, ज्या कार्यक्रमाने त्याला खास लोकप्रियता मिळवून दिली त्याच कार्यक्रमाला ओंकारने अलविदा म्हटले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून ओंकारला चांगलीच ओळख प्राप्त झाली होती, त्यामुळे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता.
काही दिवसात ओंकार भोजने झी मराठीवरील एका विनोदी कार्यक्रमात दिसणार आहे. ओंकार भोजने पुढच्या महिन्यापासून झी मराठीवरील 'फू बाई फू' या कार्यक्रमात दिसणार आहे. वैयक्तिक कारण आणि सिनेमांच्या चित्रीकरणाकरिता ओंकारने या कार्यक्रमातून एक्झिट घेतली होती. आपले सर्व कामं आटोपून तो पुन्हा त्या कार्यक्रमात परतणार ही होता. पण त्याने निर्मिती संस्थेला न कळवता थेट दुसऱ्या कार्यक्रमात एन्ट्री केली आहे.
आधी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि आता 'फू बाई फू' या कार्यक्रमातून ओंकार प्रेक्षकांना हसवायला पुन्हा येणार आहे. ओंकार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून बाहेर पडण्याची बातमी एका सोशल मीडिया पेजवरुन मिळाली असून या वक्तव्यावर ओंकार आणि वाहिनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. ओंकार टेलिव्हिजनवर 'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', ' तुमच्यासाठी काय पण', 'एकदम कडक' सोबतच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमांमधुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे.
कॉमेडी करण्याची परफेक्ट वेळ या गोष्टीचा प्रेक्षकांना उत्तम अनुभव आहे. 'अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..' त्याच्या या वाक्याचे सर्वांना वेड लागले आहे. 'फू बाई फू' या कार्यक्रमाचे अनेक सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तब्बल ९ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर झी मराठी कॉमेडीचा नवा तडका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. झी मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नवनवे विषय देत निखळ मनोरंजन करत असते.
कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी वैदेही परशुरामीवरअसून परिक्षणाची जबाबदारी अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेता उमेश कामत यांच्यावर आहे. या कार्यक्रमात मनोरंजनात निपुण असलेले कलाकार दिसणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.