Gautami Patil: आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत, गौतमी पाटीलचा रोख कोणाकडे?

Gautami Patil On Hindavi Patil: काही दिवसांपूर्वी गौतमीसोबत डान्स करणारी तिची सहकारी हिंदवी पाटील ही तिच्या फडातून वेगळी झाली. त्यामुळे जोरदार चर्चा होत होत्या. पण अशामध्ये आता गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Gautami Patil
Gautami Patil Saam Tv
Published On

Gautami Patil In Pune:

आपल्या दमदार नृत्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला थिरकायला लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेत आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर गौतमी पाटीलचे डान्स शो होत असतात. गौतमीसोबत तिच्या अनेक सहकारी देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.

पण काही दिवसांपूर्वी गौतमीसोबत डान्स करणारी तिची सहकारी हिंदवी पाटील ही तिच्या फडातून वेगळी झाली. त्यामुळे जोरदार चर्चा होत होत्या. पण अशामध्ये आता गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात म्हणत नाही.', असं म्हणत गौतमीने याविषयावर अधिक बोलणं टाळलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटीलने सांगितले की, 'मी गेल्या ११ वर्षांपासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुलींना मी शिकवले आहे. हिंदवी पाटीलचं चांगलं होऊ दे. आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत. उलट त्यांचं चांगलं होऊ दे असं म्हणतो.' अशापद्धतीने गौतमी पाटीलने या विषयावर प्रतिक्रिया देत हिंदवी पाटीलबद्दल अधिक बोलणं टाळलं.

Gautami Patil
Bigg Boss 17 Captain: कॅप्टन्सी टास्कमध्ये दोन मित्र आमने-सामने, 'हा' सदस्य बनला 'बिग बॉस 17'चा पहिला कॅप्टन

तसंच, यावेळी गौतमीने नवा चित्रपट मिळाला तर करेल असं सांगितले. पण जरी चित्रपट मिळाला तरी देखील मी डान्स करणं सोडणार नाही, असं देखील तिने स्पष्ट केले. लग्नासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी म्हणाली की, 'सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही.' यावेळी गौतमी पाटीलने मराठा आरक्षणासंदर्भात देखील आपलं स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Gautami Patil
Sadashiv Amrapurkar: अभिनेत्याच्या घराला भीषण आग, नेमकं काय घडलं?

गौतमी पाटील मराठा आरक्षणावर म्हणाली की, 'मराठा समाजाला आरक्षण मिळेलच पाहिजे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळालेच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय. कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवं. सगळं नीट सुरू आहे.', असे गौतमीने यावेळी सांगितलं. सध्या गौतमीने हिंदवी पाटीलबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gautami Patil
'12th Fail' फेम विक्रांत मेस्सी होणार बाबा, शीतल ठाकूरच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com