vikrant massey wife sheetal thakur baby shower
vikrant massey wife sheetal thakur baby showerSaam Tv

'12th Fail' फेम विक्रांत मेस्सी होणार बाबा, शीतल ठाकूरच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटो व्हायरल

Sheetal Thakur Baby Shower Photos: विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूरच्या आयुष्यातही नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यामुळे तो खूपच आनंदी आहे. हे कपल आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

Sheetal Thakur Baby Shower:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) हे वर्ष खूपच खास आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विक्रांत मेस्सीच्या '12th Fail' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. विक्रांत मेस्सीच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली.

अशामध्ये आता विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूरच्या आयुष्यातही नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यामुळे तो खूपच आनंदी आहे. हे कपल आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नुकताच शीतलचा बेबी शॉवर प्रोग्राम पार पडला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शीतल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बेबी शॉवर पार्टीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. बेबी शॉवर पार्टीमध्ये शीतलने हिरव्या रंगाच्या ड्रेस परिधान केला होता. स्टेटमेंट गोल्ड इयरिंग्ससह तिचा लूक पूर्ण केला. ज्यामध्ये ती खूपच क्युट दिसत होती. त्याचसोबत तिच्या चेहऱ्यावरील ग्लो दिसत होता.

शीतलच्या बेबी शॉवरचा केक देखील सर्वांचे लक्ष वेधू घेणार आहे. कारण हा केक जंगल थीमवर आधारित होता. केकच्या फोटोंसह तिने पोस्ट केलेल्या दुसर्‍या फोटोमध्ये शीतल एका मित्रासोबत तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. हे सर्व फोटो शेअर करत शीतलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आयुष्य खूप गोड होणार आहे. माझे बेबी शॉवर.' विशेष म्हणजे विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर बेबी शॉवर पार्टीमध्ये लिप लॉक करतानाही दिसले. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

vikrant massey wife sheetal thakur baby shower
Bigg Boss 17 Captain: कॅप्टन्सी टास्कमध्ये दोन मित्र आमने-सामने, ''सदस्य बनला 'बिग बॉस 17'चा पहिला कॅप्टन

विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर त्यांच्या पहिल्या बाळाबाबत खूपच उत्सुक आहेत. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने लग्न केले. विक्रांत आणि शीतल फेब्रुवारी 2022 मध्ये लग्नबंधनात अडकले. २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. दोघांच्या लग्नाला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. आता हे कपल आपल्या घरामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यामुळे आनंदी आहेत.

vikrant massey wife sheetal thakur baby shower
Sadashiv Amrapurkar: अभिनेत्याच्या घराला भीषण आग, नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com