Vikrant Massey Become Father Soon: गुड न्यूज! मिर्झापूर फेम विक्रांत मेस्सी लवकरच होणार बाबा...

Vikrant Massey News: मिर्झापूर आणि क्रिमिनल जस्टिस फेम विक्रांत मेस्सी लवकरच बाबा होणार आहे.
Vikrant Massey Become Father Soon
Vikrant Massey Become Father SoonInstagram
Published On

Vikrant Massey Become Father Soon

मिर्झापूर आणि क्रिमिनल जस्टिस फेम विक्रांत मेस्सी लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या काही वर्षानंतर अभिनेत्याच्या पत्नीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. विक्रांत मेसीची पत्नी शीतल ठाकुर सध्या प्रेग्नेंट असून लवकरच ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.

Vikrant Massey Become Father Soon
Urfi Javed Visited Siddhivinayak Temple: उर्फी जावेदने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, संस्कारी लूक पाहून सारे चकीत; VIDEO एकदा बघाच

विक्रांत बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे, त्याने दीपिकाच्या छपाकमध्ये, तापसी पन्नूच्या हसिना दिलरुबापासून अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. त्याने अनेक चित्रपटांच्या आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले. अभिनेता लवकरच बाबा होणार असल्यामुळे सध्या चाहते सोशल मीडियावर त्याच्यासह त्याच्या पत्नीवर कौतुकाचा वर्षाव करीत आहे.

रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अभिनेत्याची पत्नी गरोदर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रांत आणि त्याची पत्नी शीतल लवकरच आई-वडील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vikrant Massey Become Father Soon
Jawan At Oscars: 'जवान' जाणार ऑस्करला? दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी व्यक्त केली इच्छा

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच विक्रांत आणि शीतल आपल्या चाहत्यांना गुड न्यूज देणार अशी सध्या चर्चा होत आहे. त्यांनी लग्नाची बातमी देखील त्यांच्या चाहत्यांना दिली नव्हती. त्याप्रमाणेच आता आई- वडील होणार याची देखील चाहत्यांना त्यांनी गुड- न्यूज दिली नव्हती.

विक्रांतला त्याच्या खासगी आयुष्यातील माहिती शेअर करायला आवडत नाही. त्याने आपल्या आयुष्यातील गुड न्यूज अद्याप चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही. पण या बातमीमध्ये जर तथ्य असेल तर, रुबीना दिलैकनंतर विक्रांत- शीतल हे इंडस्ट्रीतील आणखी एक जोडपं आई- बाबा बनणार आहे.

१४ फेब्रुवारी २०२२ ला नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. हे दोघेही २०१५ पासून एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर विक्रांत आणि शीतलने २०१८ मध्ये लग्नबंधनात अडकले.

Vikrant Massey Become Father Soon
Leo Kannada Poster: 'लिओ' गुन्हेगार आहे? थलापती विजयच्या कन्नड पोस्टरमध्ये दडलंय रहस्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com