Urfi Javed Visited Siddhivinayak Temple: उर्फी जावेदने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, संस्कारी लूक पाहून सारे चकीत; VIDEO एकदा बघाच

Urfi Javed Trolled: नेहमी तोकडे, फाटलेले आणि विचित्र कपड्यांमध्ये घराबाहेर पडणारी उर्फी यावेळी पारंपारिक लूकमध्ये सर्वांना पाहायला मिळाली.
Urfi Javed Visited Siddhivinayak Temple
Urfi Javed Visited Siddhivinayak TempleSaam Tv
Published On

Urfi Javed News Look:

आपल्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर (Social Media) सतत चर्चेत असलेल्या टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदचा (Actress Urfi Javed) आज वेगळाच अवतार पाहायला मिळाला. उर्फी जावेदने नुकताच मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple) जाऊन दर्शन घेतले. यावेळी उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले. नेहमी तोकडे, फाटलेले आणि विचित्र कपड्यांमध्ये घराबाहेर पडणारी उर्फी यावेळी पारंपारिक लूकमध्ये सर्वांना पाहायला मिळाली. उर्फीचा हा सोज्वळ लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले.

Urfi Javed Visited Siddhivinayak Temple
Leo Kannada Poster: 'लिओ' गुन्हेगार आहे? थलापती विजयच्या कन्नड पोस्टरमध्ये दडलंय रहस्य

गणेशोत्सवानिमित्त उर्फी जावेदने सिद्धिविनायक मंदिरात पारंपरिक लूकमध्ये जाऊन गणपती बाप्पाची पूजा केली. यावेळी तिच्यासोबत अभिनेता प्रतीक सेजपालही होता. दोघांनी देखील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेत पूजा केली. उर्फी जावेदने यावेळी लाल एम्ब्रॉयडरी कुर्ता आणि पलाझो परिधान केला होता. यावर तिने लाल रंगााच एम्ब्रॉयडरी केलेला दुपट्टा देखील कॅरी केला होता. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद खूपच सुंदर दिसत होती. यासोबत उर्फी जावेदने या ड्रेससोबत स्टायलिश सोनेरी रंगाचा चष्मा घातला होता.

Urfi Javed Visited Siddhivinayak Temple
Tiger Shroff Post: बाप्पाचा आशीर्वाद घेऊन 'गणपत' येतोय; दसऱ्याला टायगर श्रॉफचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

नेहमी हटके आणि विचित्र ड्रेसिंग स्टायिलमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचा लेटेस्ट लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. उर्फीने मंदिरामध्ये जाण्यासाठी परिधान केलेला हा पोशाख पाहिल्यानंतर चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.उर्फी जावेदचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.

दरम्यान, 'बिग बॉस' फेम उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज नवनवीन विचित्र आणि हटके लूक करत उर्फी जावेद सर्वांना चकीत करत असते. आपल्या या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे ती ट्रोल देखील होत असते. कधी काचा, कधी खेळण्यातल्या कार, कधी मोबाईलचे सिमकार्ड, कधी प्लास्टिकपासून तयार केलेले कपडे परिधान करून उर्फी कॅमेऱ्यासमोर येत असते. अशामध्ये आज सिद्धिविनायक मंदिरात आलेल्या उर्फीचा संस्कारी लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Urfi Javed Visited Siddhivinayak Temple
Jawan At Oscars: 'जवान' जाणार ऑस्करला? दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी व्यक्त केली इच्छा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com