Tiger Shroff Post: बाप्पाचा आशीर्वाद घेऊन 'गणपत' येतोय; दसऱ्याला टायगर श्रॉफचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Ganapath New Poster: टायगर श्रॉफच्या आगामी 'गणपत' या चित्रपटःचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
Tiger Shroff's Upcoming Movie Ganapath New Poster
Tiger Shroff's Upcoming Movie Ganapath New PosterInstagram @tigerjackieshroff
Published On

Tiger Shroff Upcoming Movie:

टायगर श्रॉफ म्हणजे बॉलिवूडचा हिरो. हा हिरो नेहमीच त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. टायगर श्रॉफ अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार असल्याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहेत.

दरम्यान टायगर श्रॉफच्या आगामी 'गणपत' या चित्रपटःचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे टायगर श्रॉफच्या या चित्रपटाचे पोस्टर हिंदीसह तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाले आहे.

Tiger Shroff's Upcoming Movie Ganapath New Poster
Ram Charan Share Photo: 'लेकीसोबतचा पहिला सण...' राम चरणने शेअर केले गणेश चतुर्थीचे खास फोटो

सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू असतानाच टायगर श्रॉफने त्याच्या आगमीची 'गणपत' या चित्रपट पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये टायगरची मस्क्युलर बॉडी दिसत आहे. तर त्याच्या हाताला आग लागली दिसत आहे. 'त्याला शकत नाही, कारण त्याला बाप्पाची साथ आहे. नवीन दुनियेची सुरुवात करायला येतोय 'गणपत'.'

'गणपत'मध्ये टायगर श्रॉफसोबत क्रिती सेनन देखील असणार आहे. २०१४ साली टायगर आणि क्रिती यांनी 'हिरोपंती' या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्यांची या चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. (Latest Entertainment News)

टायगर श्रॉफचे पोस्टर पाहिल्यानंतर त्याचे फॅन्स खूप खुश आहेत. टायगर श्रॉफ त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. चित्रपटातील मुख्य पात्र 'गणपत'वर चित्रपटाची कथा आधारलेली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी सुरू केले आहे. 'रेम्बो' असे या चित्रपटाचे नाव आहे. त्यानंतर टायगर श्रॉफ अक्षय कुमारसह 'बडे मिया छोटे मिया' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com