BJP Maharashtra: लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लान; राज्यात ३० लाख सोशल मीडिया कार्यकर्त्यांची फौज उभी करणार

BJP Election Strategy: भाजपने देखील विरोधकांना उत्तर सडेतोड देण्यासाठी मास्टर प्लान आखला आहे.
Amit Shah BJP to deploy maharashtra 30 lakh social media workers for lok sabha 2024 electionsModi
Amit Shah BJP to deploy maharashtra 30 lakh social media workers for lok sabha 2024 electionsModi Saamtv
Published On

BJP Maharashtra Election Strategy

आगामी लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीने भाजपला कोंडीत पकडण्याची रणनिती आखली असताना, दुसरीकडे भाजपने देखील विरोधकांना उत्तर सडेतोड देण्यासाठी मास्टर प्लान आखला आहे. (Latest Marathi News)

Amit Shah BJP to deploy maharashtra 30 lakh social media workers for lok sabha 2024 electionsModi
Bachchu Kadu News : अफजलखानासारखी मिठी मारून भाजप मित्रपक्षांना संपवतो; बच्चू कडूंचा 'प्रहार'

विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार भाजपकडून सोशल मीडिया (Social Media) आर्मीची स्थापना केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून ३० लाख सोशल मीडिया कार्यकर्ते तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभेत ५ हजार, तर लोकसभेत ५० हजार सोशल मीडिया फॉलोअर्सचा समावेश असणार आहे.

भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियावर भाजपचे ३० लाख कार्यकर्ते सक्रीय असतील. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५ हजार, तर लोकसभा मतदारसंघात ५० हजार सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा समावेश असेल.

सोशल मीडिया सांभाळण्यासाठी निवड झालेले कार्यकर्ते भाजपने (BJP Maharashtra) केलेल्या विकासाची कामे, तसेच पंतप्रधान मोदींची लोकप्रियता मतदारांपर्यंत पोहचवणार आहे. त्याचबरोबर विरोधकांनी मोदी सरकारच्या विकासकामांना कशा पद्धतीने विरोध केला, हे देखील सोशल मीडिया कार्यकर्ते मतदारांना पटवून सांगणार आहे.

याव्यतिरिक्त विरोधकांकडून भाजपवर वारंवार केल्या जाणाऱ्या टीकेला देखील सोशल मीडिया कार्यकर्ते जोरदार प्रत्युत्तर देतील, त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप सोशल मीडिया कार्यकर्ते विरुद्ध महाविकास आघाडी असा डिजिटल सामना महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार आहे.

सध्याच्या घडीला केंद्र व राज्य सरकारचे महाराष्ट्रात ६ कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना कॉल करण्यासाठी भाजपकडून २५ कॉल सेंटरही उभारले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. भाजपकडून प्रत्येक मदत मिळालेल्या मतदारांना या कॉल सेंटरमधून कॉल केला जाईल, तसेच त्यांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले जाणार आहे.

Amit Shah BJP to deploy maharashtra 30 lakh social media workers for lok sabha 2024 electionsModi
Breaking News: कोर्टाच्या दणक्यानंतर शिंदे सरकारचं एक पाऊल मागे; मविआच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती उठवली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com