Bachchu Kadu News : अफजलखानासारखी मिठी मारून भाजप मित्रपक्षांना संपवतो; बच्चू कडूंचा 'प्रहार'

Bachchu Kadu Vs BJP : काही महिन्यांपासून भाजप आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील राजकीय दरी आणखीनच रुंद होत चालली आहे.
Bachchu Kadu Vs BJP
Bachchu Kadu Vs BJPSAAM TV

संदीप नागरे, हिंगोली

Bachchu Kadu criticises BJP :

गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील राजकीय दरी आणखीनच रुंद होत चालली आहे. अमरावतीत जहरी टीका केल्यानंतर आज, हिंगोलीत बच्चू कडूंनी भाजपवर थेट 'प्रहार' केला.

भाजप मित्रपक्षांना आधी जवळ करतो आणि नंतर अफजलखानासारखी मिठी मारून त्यांना संपवतो, अशी जहरी टीका कडू यांनी केली. माझी कुणाशी युती नाही. जनतेशी युती आहे, अशी कडवट प्रतिक्रियाही त्यांनी दिली. (Maharashtra Politics)

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंच्या पराभवाबाबत वक्तव्य केले होते. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली होती. काँग्रेससह इतर पक्षांकडून जितका त्रास नाही, त्याहून जास्त भाजपकडून होतोय, असा गंभीर आरोप नुकताच कडूंनी केला होता. आता हिंगोलीत दिव्यांग मेळाव्यासाठी आलेल्या कडूंनी पुन्हा भाजपवर तोफ डागली आहे.

बच्चू कडू यांनी यावेळी भाजपला अफजलखान म्हणून संबोधले. भाजपने मित्रपक्षाला त्रास देणे बंद करावे, असा इशाराही त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्या मतदारसंघात येऊन कोणत्याही परिस्थितीत बच्चू कडू निवडणुकीत पडले पाहिजेत. त्यासाठी कडू यांची प्रकरणे बाहेर काढा असा सल्लाही दिला होता. आपल्याला निवडणुकीत हरवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे, असंही कडू यांनी सांगितले.

Bachchu Kadu Vs BJP
Sadabhau Khot News: बारामतीकर राज्यात आग लावायचे काम करतात; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

मित्रपक्षाला आधी जवळ करायचं आणि नंतर अफजलखानासारखी मिठी मारायची हे असे प्रकार भाजपने बंद केले पाहिजेत. त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, असा सल्लाही कडू यांनी दिला.

Bachchu Kadu Vs BJP
Bacchu Kadu News: कामापुरतं वापरुन फेकून देण्याचे धंदे भाजपने बंद करावेत; आमदार बच्चू कडू कडाडले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com