Salman house firing Case Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Anuj Thapar News : सलमान खानच्या घरावर गोळीबारातील आरोपी अनुज थापरने लॉकअपमध्येच काल आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने तुरूंगामध्ये गळफास घेतला नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आहे.

Chetan Bodke

Anuj Thapan Family Alleges Murder By Police

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापरने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्येच काल आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आरोपी अनुज थापर मुळचा पंजाबचा आहे. त्याने काल शौचालयातील खिडकीला चादरीच्या पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याने तुरूंगामध्ये गळफास घेतला नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. अनुजचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) मुंबईबाहेर करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत.

अनुजने आत्महत्या केली नाही, असं विधान त्याच्या गावचे सरपंच मनोज कुमार गोदरा यांनी केले आहे. पोलिस कोठडीमध्ये होत असलेल्या छळवणुकीमुळे त्याने आत्महत्या केली आहे. असा त्यांनी आरोप केलेला आहे. "ही आत्महत्या नाही तर, हत्या आहे. याची चौकशी महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही एजन्सीने करावी." असं अनुजच्या गावचे सरपंच म्हणाले आहेत. "अनुजने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे. आम्ही त्याच्यासाठी न्याय मागतो. पोलिस चौकशी व्हायला हवी." अशी मागणी अनुजच्या भावासह त्याचे सर्व कुटुंबीय करीत आहे. (Bollywood News)

अनुजच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पाल आणि विकी गुप्ता या हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्या प्रकरणी सोनू बिश्नोईसह अनुज थापनला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सागर आणि विकी यांना गुजरातच्या भूजमधून अटक करण्यात आली असून सध्या ते दोघेही मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सलमान खानच्या वांद्र्यामधील गॅलेक्सी अपार्टममेंटवर बिष्णोई गँगच्या हल्लेखोरांनी १४ एप्रिलला पहाटे गोळीबार केला होता. विकी गुप्ता, सागर पाल, सोनू बिश्नोई आणि अनुप थापन अशी या ४ आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील ४ आरोपींविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. आरोपींविरोधात ‘मोक्का’ लावल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडून एसीपी दत्तात्रय नाळे यांच्या विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना ८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT