1000 Cr. Earn Indian Films : १००० कोटी कमावलेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहिले का ?, पाहा यादी

1000 Cr. Earn Films : १००० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे, जाणून घेऊया...
1000 Cr. Earn 6 Indian Films
1000 Cr. Earn 6 Indian FilmsSaam Tv

1000 Cr. Earn 6 Indian Films

२०२३ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी खास ठरलं. सिनेरसिकांना गेल्या वर्षी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळाले आहेत. बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये क्वचितच असे काही चित्रपट आहेत, त्यांनी परदेशातही आपली जादू दाखवली आहे. २०२३मध्ये रिलीज झालेले असे अनेक चित्रपट आहेत, त्यांनी देशासह परदेशात कोट्यवधींची कमाई केलेली आहे. जाणून घेऊया, १००० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या चित्रपटांच्या यादीत कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे.

1000 Cr. Earn 6 Indian Films
Salman Khan News : भाईजान अर्ध्या रात्री लंडनहून मुंबईत परतला; विमानतळावर पापाराझींची नजर चुकवत गाठलं घर
Dangal Film
Dangal FilmSaam Tv

दंगल- Dangal

२०१६ मध्ये रिलीज झालेला आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटानेही देशासह परदेशामध्ये जोरदार कमाई केली आहे. १३२ कोटी रूपये खर्चुन तयार झालेल्या चित्रपटाने जगभरामध्ये २, ०२४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बाहुबली-२ Bahubali 2

प्रभास स्टारर ‘बाहुबली २’ चित्रपट २५० कोटी खर्चुन तयार केलेला आहे. बिग बजेट चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आलेला आहे. चित्रपटाने जगभरामध्ये, १७८८ कोटी रूपयांची छप्परफाड कमाई केली आहे.

1000 Cr. Earn 6 Indian Films
Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?
RRR Movie Poster
RRR Movie Poster Saam Tv

आरआरआर- RRR

ऑस्कर विनर 'आरआरआर' चित्रपटानेही जगभरामध्ये जोरदार कमाई केलेली आहे. १२३६ कोटी रूपयांची चित्रपटाने जगभरात कमाई केलेली आहे. ५५० कोटी खर्चुन चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. या चित्रपटाची भुरळ हॉलिवूड सिनेतारकांनाही पडलेली आहे.

केजीएफ २- KGF Chapter 2

टॉलिवूड अभिनेता यशच्या ‘केजीएफ २’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केलेली आहे. अवघ्या काही कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटाला जगभरामधील चाहत्यांकडून तुफान प्रेम मिळालेले आहे. चित्रपटाने जगभरामध्ये १२३५ कोटींचा गल्ला जमावला आहे.

1000 Cr. Earn 6 Indian Films
Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल
Jawan Film
Jawan FilmSaam Tv

जवान- Jawan

तब्बल तीन वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर शाहरूख खानने रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केले. त्याच्या ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. ३०० कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरामध्ये ११६० कोटींची कमाई केलेली आहे.

Pathaan Film
Pathaan FilmSaam Tv

पठान- Pathaan

शाहरूख खानचा ‘पठान’ चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये रिलीज झाला होता. देशासह परदेशामध्ये चित्रपटाने दमदार कमाई केली होती. १०५०.०५ कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये चित्रपटाचा समावेश झालेला आहे. २४० कोटींमध्ये चित्रपट तयार झालेला आहे.

1000 Cr. Earn 6 Indian Films
Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com