Gadar- 2 Movie Box Office Collection: 'गदर- 2' ने मोडला 'बाहुबली- 2' चा रेकॉर्ड, सर्वात जास्त कमाई करणारा ठरला दुसरा हिंदी चित्रपट

gadar 2 broke the record of baahubali 2: या चित्रपटाने 'बाहुबली-२' चित्रपटाला (Baahubali-2 Movie) टक्कर दिली असून प्रदर्शित झाल्यानंतर २९ दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
gadar 2 broke the record of baahubali 2
gadar 2 broke the record of baahubali 2Saam tv

Gadar- 2 Movie Collection:

'गदर' (Gadar Movie) च्या यशानंतर तब्बल २२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'गदर-२' (Gadar- 2 Movie) चित्रपटाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाने सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक करत बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने 'बाहुबली-२' चित्रपटाला (Baahubali-2 Movie) टक्कर दिली असून प्रदर्शित झाल्यानंतर २९ दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

gadar 2 broke the record of baahubali 2
Katrina Kaif Post: कतरिना कैफ लवकरच देणार गुड न्यूज; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

'गदर-२' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे २९ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाने ५११ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. यासोबतच हा सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.

gadar 2 broke the record of baahubali 2
Pushpa 2 Set First Photo: ‘पुष्पा 2’ चा भव्य सेट पाहिलात का?, रश्मिका मंदाने शेअर केला फोटो

बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर 'किंग खान' म्हणजेच शहारुख खानचा 'पठान' चित्रपट येतो. पठान चित्रपटाने ५४३ कोटींचा गल्ला जमा केला होता. तर 'गदर-२' ला 'पठान'चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी ३५ कोटी रुपये आणखी कमवावे लागतील. तर 'बाहुबली-२' च्या हिंदी वर्जनने ५१०.९९ कोटींची कमाई केली होती.

gadar 2 broke the record of baahubali 2
Gashmeer Mahajani Post: 'केस कापले असते तर...', वडिलांच्या निधनानंतर टक्कल न केल्याबद्दल विचारणाऱ्या नेटकऱ्याला गश्मीरने चांगलंच झापलं

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली-२' चित्रपटाने सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड तोडत ५१० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर पुढच्या ५ वर्षांत या चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात कोणत्याही चित्रपटाला यश आले नव्हते. अखेर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पठान' चित्रपटाने बाहुबलीचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'गदर २' ने देखील 'बाहुबली २' चा रेकॉर्ड ब्रेक करत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com