Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

Salman house firing Case Update : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीने आत्महत्या केलीय. मुंबई पोलीस आयुक्ताच्या कार्यालयमधील लॉकअपमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
Salman house firing Case Update
Salman house firing Case UpdateSaam Tv

संजय गडदे,

Salman Khan House Firing Case: मुंबई: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीने आत्महत्या केली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्येच या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अनुप थापन, असं या आरोपीचं नाव असून त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आल मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर बिष्णोई गँगने गोळीबार केला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सलमान खानच्या वांद्र्यमधील गॅलेक्सी अपार्टममेंटवर बिष्णोई गँगच्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. मुंबई पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील ४ आरोपींविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. विकी गुप्ता, सागर पाल आणि अनुप थापन, अशी या आरोपींची नावे असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील अनुप थापनने आज पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील लॉकअपमध्ये आत्महत्या केली.

दरम्यान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारीची घटना घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवत गोळीबारातील आरोपींची धरपकड केली. पोलिसांनी सुरुवातीला विकी आणि सागर या दोघांना अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचं समोर आलं. याप्रकरणात पुढे तपास सुरू करत पोलिसांनी अनुप आणि सोनूकुमारला अटक केली. अनुप आणि सोनूकुमारने गोळीबारासाठी शस्त्र पुरवली होती. पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोईसह अटक केलेल्या ४ आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली.

नेमकं प्रकरण आहे काय?

राजस्थानमध्ये हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खानने चिंकारा हरणांची शिकार केली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. लॉरेन्स बिष्णोई ज्या बिष्णोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. त्यामुळे बिष्णोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे.

याच रागातून लॉरेन्स बिष्णोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान लॉरेन्स बिष्णोई आणि वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रारनं अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिलीय. बिष्णोई आणि गोल्डी ब्रारनं अनेकदा मुंबईत सलमानवर हल्ला करण्यासाठी त्यांचे शूटर्स पाठवले होते.

Salman house firing Case Update
Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपींनी गोळीबारानंतर पिस्तुलाचं काय केलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com