Manasvi Choudhary
दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं.
सुहानी केवळ १९ वर्षांची होती. यामुळे तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला.
नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचारादरम्यान सुहानीचे निधन झाले.
दोन महिन्यांपूर्वी सुहानीच्या हाताला सूज आली होती. काही दिवसांतच तिच्या संपूर्ण शरीरावर सूज आली.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सुहानीला डर्माटोमायोसिटिस नावाचा आजार झाला होता.
डर्माटोमायोसिटिस हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजावरती तातडीचे उपचार नाहीत.
डर्माटोमायोसिटिसच्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, स्नायू कमकुवत होणे, दाहक मायोपॅथी तसेच स्नायूंना सूज येते.
डर्माटोमायोसिटिस हा आजार वयोवृद्ध व्यक्तींना तसेच लहान मुलांना देखील होतो.
डर्माटोमायोसिटिस हा आजार पुरूषांपेक्षा महिलांना जास्त प्रमाणात होतो.
हा आजार होताच शरीराची रोगप्रतिकारशक्ती फारच कमकुवत होते. ज्याचा उपचार स्टिरॉइड्स आहे.
या आजाराची लक्षणे उशीरा दिसू लागतात.यामध्ये त्वचेचा रंग बदलतो, पेशींमध्ये जळजळ होते. तसेच त्वचेवर पुरळ उठतात.
स्नायू कमकुवत होतात
डर्माटोमायोसिटिसमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने स्नायू झपाट्याने कमकुवत होतात.