Yash Birthday: पोरगा सुपरस्टार झाला तरी वडील अजूनही बस चालवतात; केजीएफ स्टारर यशचा 'डाऊन टू अर्थ' थक्क करणारा प्रवास

Yash Turns At 37 Age: केजीएफ फेम अभिनेता यशचा आज ३७ वा वाढदिवस
Yash Birthday
Yash BirthdaySaam TV

Yash Birthday

केजीएफ (KGF) फेम अभिनेता यशचा आज ३७ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी झाला आहे. अभिनेत्याचं खरं नाव यशनसून 'नवीन कुमार गौडा' असं आहे. यशचे वडील अरुण कुमार कर्नाटक परिवहन सेवेत ड्रायव्हर असून त्याची पुष्पा गृहिणी आहे. (Tollywood)

यशने आपल्या सिनेकरियरची सुरुवात २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोग्गीना मनसू' चित्रपटातून केली होती. यशने 'राजधानी', 'मिस्टर अँड मिसेस रामाचारी' आणि 'किरतका' सारख्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली असली तरी, त्याला 'KGF चॅप्टर 1' मधूनच विशेष ओळख मिळाली. आज आपण यशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासंबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. (Bollywood Actor)

Yash Birthday
Aishwarya Rai: ऐश्वर्या-अभिषेकमधील दुरावा संपला, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पती अभिषेकसोबत कबड्डी टीमला केलं चीअर्स, VIDEO होतोय व्हायरल

यशने अशोक कश्यप दिग्दर्शित 'नंदा गोकुळा' या टेलिव्हिजन सिरियलमधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. चित्रपटसृष्टीत यशची ओळख 'रॉकींग स्टार' याच नावाने आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस रामाचारी' या चित्रपटाने यशला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. तर, २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'KGF चॅप्टर 1' या चित्रपटातून त्याला फक्त एकट्या भारतातच नाही तर, जगभरामध्ये प्रसिद्धी दिली. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींचा गल्ला जमवला. (Bollywood News)

Yash Birthday
Raj Thackeray: एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील, राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

यश जवळपास कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. यशचे बंगळुरूमध्ये २ अलिशान घरे देखील आहे. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझे वडील अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करतात ही गोष्ट त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे."

यश हा कायमच सोशल मीडियावर आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. 2017 मध्ये यशने 'यश मार्ग फाउंडेशन'ची स्थापना केली होती. या फाऊंडेशनने कोप्पल जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्च करून लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारा तलाव बांधला, ज्यातून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. (Entertainment News)

Yash Birthday
Anil Kapoor Fitness: 'फायटर'साठी अनिल कपूरने घेतली बरीच मेहनत, तब्बल इतके किलो वजन केलं कमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com