Panchayat 3 Released Date
Panchayat 3 Released DateSaam Tv

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

Panchayat 3 Web Series Latest Update : बहुप्रतिक्षित ‘पंचायत ३’ वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली आहे.

Panchayat 3 Released Date

बहुप्रतिक्षित ‘पंचायत ३’ वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रोमो शेअर केलेला होता, पण त्यावेळी वेबसीरिजची रिलीज डेट जाहीर केलेली नव्हती. आता नुकतंच निर्मात्यांनी एक पोस्टर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी मे २०२४ सांगितलं असून अद्याप तारीख सांगितली नाही.

Panchayat 3 Released Date
Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये लौकी (दुधी) दिसत आहे. पाठीमागे बॅक ग्राउंडला ग्राम पंचायतचं ऑफिस दिसतंय. दुधी सर्व बाजूला केलेले दिसत असून मे २०२४ अशी तारीख आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्याप निर्मात्यांनी वेबसीरिजची तारीख जाहीर केलेली नाही. प्रेक्षकांना वेबसीरिजबद्दल कमालीचे उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ‘पंचायत ३’ वेबसीरिज आयपीएल २०२४ नंतर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पण अद्याप निर्मात्यांकडून रिलीज डेटबद्दल काहीही सांगितले नाही. (Web Series)

चाहते ‘पंचायत ३’साठी उत्सुक आहेत. वेबसीरीजमध्ये फुलेरा गावचे सचिव म्हणून जितेंद्र कुमार नाही तर असिफ खान दिसणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. रिंकू आणि सचिवची लव्हस्टोरी सीझन ३ मध्ये तरी खुलणार का ? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वेबसीरीज पाहिल्यावरच कळेल. ‘पंचायत’ या वेबसीरीजचे दोन्हीही सीझन ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहे. सीरीजचा पहिला सीझन २०२० मध्ये तर, दुसरा सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला होता. आता प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून तिसऱ्या सिझनची उत्सुकता आहे. (OTT)

Panchayat 3 Released Date
Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

फॅमिली आणि कॉमेडी ड्रामा असणाऱ्या या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीता गुप्ता,, चंदन रॉय, फैसल मलिक, अशोक पाठक, पंकज झा, सुनीता राजवर हे कलाकार आहेत. (Entertainment News)

Panchayat 3 Released Date
Rupali Ganguly Joins BJP: मोठी बातमी! 'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, हाती घेतले कमळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com