Panchayat 3 Release Date: 'पंचायत 3' ची प्रतीक्षा संपली! याच महिन्यात या दिवशी रिलीज होणार नवीन सीझन

Panchayat 3 News: 'पंचायत' ही एक अशी सीरीज आहे, ज्याच्या पुढच्या सीझनची प्रत्येकजण वाट पाहत आहे. प्राइम व्हिडीओद्वारे जेव्हाही एखादी पोस्ट शेअर केली जाते, तेव्हा युजर्स 'पंचायत' आणि 'मिर्झापूर' बद्दल सर्वाधिक प्रश्न विचारतात.
Panchayat 3 Release Date
Panchayat 3 Release DateSaam Tv
Published On

Panchayat 3 Release Date:

'पंचायत' ही एक अशी सीरीज आहे, ज्याच्या पुढच्या सीझनची प्रत्येकजण वाट पाहत आहे. प्राइम व्हिडीओद्वारे जेव्हाही एखादी पोस्ट शेअर केली जाते, तेव्हा युजर्स 'पंचायत' आणि 'मिर्झापूर' बद्दल सर्वाधिक प्रश्न विचारतात. काही दिवसांपूर्वीच वेब सीरिजचे दोन नवीन पोस्टर शेअर करण्यात आले होते.

ज्यामध्ये जितेंद्र कुमारचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. यात ही सीरीज कधी लॉन्च होणार, याबाबत महिवटी देण्यात आली नव्हती. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण या महिन्यात तुम्हाला 'पंचायत' सीझन 3 पाहायला मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Panchayat 3 Release Date
Animal Movie: 'अ‍ॅनिमल सारखे चित्रपट हिट होणे धोकादायक', जावेद अख्तर म्हणाले...

नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात होणार आहे. livehindustan ने दिलेल्या वृत्तानुसार, 'पंचायत 3' 15 जानेवारीला रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडिओ इंडियाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र प्राइम व्हिडिओ इंडोनेशियावर 'पंचायत 3' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.   (Latest Marathi News)

चार दिवसांनी दोन नवीन वेब सिरीज

रोहित शेट्टीची 'इंडियन पोलिस फोर्स' ही वेबसिरीज पंचायत 3 नंतर अवघ्या 4 दिवसांनी येणार आहे. याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे की, दोन सीरीज इतक्या लवकर कशा येत आहेत आणि प्राइम व्हिडिओ इंडियाच्या हँडलवरून अद्याप अधिकृतपणे का याची घोषित करण्यात आली.

Panchayat 3 Release Date
Priyadarshini Indalkar Post: प्रियदर्शनीचा “सावित्रीची लेक” पुरस्काराने सन्मान; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘हास्यजत्रेच्या पुण्याईमुळे असे पुरस्कार...’

दरम्यान, यापूर्वी पंचायत 3 चे दोन पोस्टर शेअर करण्यात आले होते. एकामध्ये जितेंद्र कुमार पंचायत सचिवाच्या भूमिकेत दिसत आहे. तो बाईकवर बसला असून त्याच्या मागे त्याची बॅग आहे. तो फुलेरा गाव सोडून जात असल्याचे फोटोत दिसते. दुसऱ्या फोटोत दुर्गेश कुमार, अशोक पाठक आणि बुल्लू कुमार बाकावर बसलेले आहेत. त्याच्या मागे भिंतीवर लिहिले आहे, 'ठोकर लगती है तो दर्द होता है, तभी तो मनुष्य सीख पाता है.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com