Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू; जीन्स, स्कर्ट, स्लिवलेस टॉप घातल्यास 'नो एन्ट्री'

Shree Jagannath Temple Dress Code: मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना योग्य कपडे घालावे लागतील. १ जानेवारी २०२४ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात गुटखा आणि पान खाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
 Shree Jagannath Temple Dress Code
Shree Jagannath Temple Dress CodeSaamtv
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. २ जानेवारी २०२४

Puri Jagannath Temple Dress Code:

पुरी येथील जगविख्यात जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर प्रशासनाने ठरवलेले ड्रेसकोड घालून प्रवेश करणे बंधनकारक केले आहे. १ जानेवारी २०२४ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात गुटखा आणि पान खाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओडीसामधील प्रसिद्ध जनन्नाथ मंदिर प्रशासनाने सोमवारपासून (१ डिसेंबर) मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य केला आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या आवारात गुटखा आणि पान आणि प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने यापूर्वी यासंबंधीचा आदेश जारी केला होता तसेच पोलिसांनाही बंदीची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी गुटखा आणि पान खाण्यावरही बंदी लागू करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Shree Jagannath Temple Dress Code
Petrol Pump : पंपावर लागले पेट्रोल संपल्याच्या पाट्या; वाहनधारकांच्या लांबचलांब रांगा

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे, मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना योग्य कपडे घालावे लागतील. हाफ पँट, चड्डी, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

दरम्यान, ड्रेसकोडचे नियम लागू झाल्यामुळे 2024 च्या पहिल्या दिवशी मंदिरात येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान केलेले दिसले आणि महिलांनी साडी किंवा सलवार कमीज घातलेले होते. (Latest Marathi News)

 Shree Jagannath Temple Dress Code
Karad: 'यशवंतराव पतसंस्था' अवसायनात, इंद्रजीत मोहिते परदेशात; कराडसह वाळवातील शेतकऱ्यांच्या पैशांचे काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com