वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी जपानला भूकंपाचे एकापाठोपाठ एक तब्बल १५५ धक्के बसले.
या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही शेकडो लोक बेपत्ता असून बचावपथकाकडून त्यांच्या शोध घेतला जातोय.
जपानमध्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ इतकी मोजली गेली.
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी जपान हादरून गेला. अनेक शहरातील रस्त्यांवर भेगा पडल्या तर काही ठिकाणी विजेचे खांब देखील उन्मळून पडले.
भूकंपामुळे हजारो घरांची पडझड झाली, तसेच काही घरांना आगही लागली. भूकंपानंतर झालेल्या पडझडीमुळे अनेक नागरिक राडारोड्याखाली अडकल्याचे दिसून आले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वाजिमा शहरांत भूकंपाचे मुख्य केंद्र होतं. तर, १९ जणांना कार्डिअॅक अटॅक आल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिली.
भूकंपामुळे इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या. 32 हजारांहून अधिक घरांची वीज गेली आहे.
भूकंपानंतर हवामान विभागाने याठिकाणी त्सुनामीचा इशाला दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.