रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'अॅनिमल' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 886 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे.
पण एकीकडे या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत असतानाच दुसरीकडे यावर टीकाही होत आहे. आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी ब्लॉकबस्टर हिट ठरणारा हा चित्रपट धोकादायक असल्याचे म्हटले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जावेद अख्तर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आज अॅनिमल या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, जर एखादा चित्रपट असेल ज्यामध्ये पुरुष स्त्रीला म्हणतो, 'माझे बूट चाट, महिलेला कानशिलात लागवण्यात गैर काय?' आणि तो चित्रपट सुपरहिट होत असेल तर ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. (Latest Marathi News)
जावेद अख्तर यांनी थेट रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचे नाव न घेता, त्यातील संवादांचा उल्लेख करून आपण त्याबद्दल बोलत असल्याचे स्पष्ट केले. रणबीर कपूरने चित्रपटातील तृप्ती डिमरीच्या पात्राला चपला चाटण्यास सांगितले होते.
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ज्यामध्ये अफाट अॅक्शन मिळालं आहे. यावर जावेद अख्तर म्हणाले, "सिनेमे करणार्यांपेक्षा सिनेमा पाहणार्यांवर मोठी जबाबदारी आहे. ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ठरवा कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचे आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचे नाहीत."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.