प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’कडे पाहिले जाते. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरीज, चित्रपट आणि वेबफिल्म्स कायमच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘पंचायत ३’ या वेबसीरीजची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर, प्रेक्षकांच्या भेटीला तिसरा सीझन येणार आहे. नुकतंच ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’च्या सोशल मीडिया हँडलवरुन वेबसीरीजचा पहिला लूक शेअर केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांच्या ‘पंचायत’ सीरीजची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मालिकेची शुटिंग संपली असून नुकतंच निर्मात्यांनी मालिकेतील फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शेअर केलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये, फुलेरा गावचे सेक्रेटरी अभिषेक त्रिपाठी दिसत आहे. सेक्रेटरीच्या खांद्यावर बॅग पाहायला मिळत आहे. अभिषेक अर्थात जितेंद्र कुमार कुठे तरी जात आहे. हा फोटो पाहून बाईकवर कुठे चाललेय? असा प्रश्न नेटकरी विचारत आहे. (Web Series)
तर दुसऱ्या फोटोत बनराकसच्या भूमिकेत असलेला दुर्गेश कुमार, विनोदच्या भूमिकेतला अशोक पाठक आणि प्रल्हादच्या भूमिकेतला फैसल मलिक एकत्र बसलेले दिसत आहे. “आम्हाला माहित आहे, कुठल्याही गोष्टीची वाट पाहणे खूप कठीण आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी थेट सेटवरुन एक खास गोष्ट घेऊन आलो आहोत.” फोटोंना असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर सीरीजचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. (OTT)
‘पंचायत’ या वेबसीरीजचे दोन्हीही सीझन ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहे. सीरीजचा पहिला सीझन २०२० मध्ये तर, दुसरा सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला होता. आता प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून तिसऱ्या सिझनची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर ‘पंचायत ३’ वेबसीरीज मार्च २०२३ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
फॅमिली आणि कॉमेडी ड्रामा असणाऱ्या या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीता गुप्ता, चंदन रॉय, फैसल मलिक, अशोक पाठव, पंकज झा, सुनीता राजवर हे कलाकार आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.