Ekda Yeun Tar Bagha Review : खळखळून हसायचं आहे ... 'एकदा येऊन तर बघा'; रिव्ह्यू वाचून तर बघा!

Prasad Khandekar Movie: या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर पडताच प्रेक्षक त्याच्यावर प्रतिक्रिया देत दिग्दर्शकासह संपूर्ण टीमचे कौतुक करत आहेत.
Ekda Yeun Tar Bagha Movie
Ekda Yeun Tar Bagha MovieSaam Tv
Published On

Ekda Yeun Tar Bagha Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) यांचा ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha Movie) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकर दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर पडताच प्रेक्षक त्याच्यावर प्रतिक्रिया देत दिग्दर्शकासह संपूर्ण टीमचे कौतुक करत आहेत.

प्रत्येकाला आपल्या जीवनात यश आणि अपयशाचा सामना करावा लागतो हे प्रत्येकाला माहिती आहे. पण हा सामना करताना हसत- खेळत जीवन कसे जगावे?, स्वतः आनंदी जीवन जगताना आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला आनंदी कसे ठेवावे? कारण कुटुंबाची साथ असली की माणूस कोणत्याही संकटावर सहज मात करू शकतो. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटातील फुलंब्रीकर कुटुंबाची हीच कहाणी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चित्रपटात दाखवण्यात आलेले फुलंब्रीकर कुटुंब हे हसत-खेळत आनंदी जीवन जगणारे असं एक कुटुंब आहे. आयुष्य जगताना फुलंब्रीकर कुटुंब त्यांच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटावर एकत्रित मात कशी काय करतात हे या चित्रपटात विनोदी ढंगाने दाखविण्यात आले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता आणि लेखक प्रसाद खांडेकरने 'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

या चित्रपटाची कथा फुलंब्रीकर कुटुंबीयांवर आधारित आहे. या कुटुंबात श्रवणची भूमिका गिरीश कुलकर्णी, फाल्गुनची भूमिका प्रसाद खांडेकर आणि कार्तिकची भूमिका ओंकार भोजने याने साकारली आहे. हे तिघेही सख्खे भाऊ दाखवण्यात आले आहेत. श्रवणचे रोहिणी म्हणजेच तेजस्विनी पंडितसोबत लग्न झालेले असते. रोहिणीची बहीण अश्विनी म्हणजे नम्रता संभेराव असे सगळे कुटुंब एकत्र राहात असतात.

Ekda Yeun Tar Bagha Movie
Rohit Mane Wife Ukhana: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेच्या बायकोने घेतला जबरदस्त उखाणा, नम्रता संभेरावने शेअर केला VIDEO

अशातच एक दिवस त्यांचे गाव पर्यटन स्थळ म्हणून जाहीर झाल्याची माहिती श्रवणला मिळते. त्यामुळे त्यांच्या जागेला चांगलाच भाव येणार असतो. अशामध्ये हे संपूर्ण कुटुंब आपल्या गावी येतात. तेथे त्यांना नूतन शेठ म्हणजेच सयाजी शिंदे भेटतो. तो त्यांची जागा विकत घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे कुटुंबीय त्याला स्पष्ट नकार देतात आणि स्वतःचे 'एकदा येऊन तर बघा' नावाचे हॉटेल सुरू करतात.

त्यानंतर या हॉटेलमध्ये कशा गमती- जमती घडतात?, फुलंब्रीकर कुटुंबीयांवर कोणकोणती संकटे येतात?, यामधून ते कसे मार्ग काढतात?, अडचणीतून बाहेर येण्यासाठी ते काय आणि कोणते निर्णय घेतात?, नूतन शेठ आणि गुलाबी बाबा म्हणजेच भाऊ कदम यांचे पुढे काय होते? या सर्व तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचा उलगडा हा चित्रपट पाहिल्यानंतरच होईल.

Ekda Yeun Tar Bagha Movie
Sanya Malhotra Dance Video: सान्या मल्होत्राने बहिणीच्या लग्नात केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘एकदा येऊन तर बघा’च्या माध्यमातून एक विनोदी चित्रपट तयार केला आहे. त्याचबरोबर एखादे संकट आले तर संपूर्ण कुटुंबाने त्यावर कशापद्धतीने मात केली पाहिजे हेही त्यांनी या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, प्रसाद खांडेकर, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, भाऊ कदम, ओंकार भोजने, राजेंद्र शिसाटकर, वनिता खरात, पॅडी कांबळे, शशिकांत केरकर, रोहित माने यासारखे अष्टपैलू कलाकार आणि त्यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या कलाकारांनी या चित्रपटाच्या माध्यमातून धमाल केली आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून चित्रपटाला चांगलीच रंगत आणलेली आहे.

Ekda Yeun Tar Bagha Movie
Ajinkya Nanaware: मालिकांनंतर अजिंक्य ननावरेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'सोंग्या'मध्ये साकारणार लक्षवेधी भूमिका

महत्वाचे म्हणजे, या चित्रपटात सगळ्यात जास्त भाव खाऊन गेला तो म्हणजे अभिनेता गिरीश कुलकर्णी. त्याची भूमिका काहीशी गंभीर स्वरूपाची दाखवण्यात आली आहे. परंतू त्याच्या या भूमिकेने चित्रपटामध्ये छान रंगत भरली आहे. त्याच्या भूमिकेने चांगलीच विनोद निर्मिती केली असून प्रेक्षकांना हसवण्यास भाग पाडले आहे. या चित्रपटात भाऊ कदमच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आलेले आहेत. असे असले तरी त्याने आपल्या जबरदस्त अभिनयच्या माध्यमातून आपली चांगली चमक दाखवली आहे.

मध्यांतरापर्यंत चित्रपटाने छान पकड घेतलेली आहे. मात्र उत्तरार्धात ही पकड सैल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटात रंजकता राहत नाही. फारशी उत्सुकता ताणली जात नाही. त्यातच चित्रपटाचा क्लायमॅक्स फारसा परिणामकारक झालेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील संगीत अतिशय उत्तम आहे. त्याचे संपूर्ण श्रेय संगीतकार रोहन रोहन यांना द्यावे लागेल. 'आली आली गं भागाबाई हे' गाणं नव्या ढंगात सादर करण्यात आले आहे आणि ते अतिशय छान झाले आहे.

Ekda Yeun Tar Bagha Movie
Vidyut Jammwal: न्यूड फोटोशूटमुळे विद्युत जामवाल ट्रोल, नेटिझन्सनी म्हणाले रणवीर सिंगसोबत राहण्याचा परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com