Sanya Malhotra Dance Video: सान्या मल्होत्राने बहिणीच्या लग्नात केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

Sanya Malhotra Dance In Sister Wedding: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या सान्या मल्होत्राच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट्स केल्या जात आहेत.
Sanya Malhotra Dance Video
Sanya Malhotra Dance VideoSaam Tv
Published On

Actress Sanya Malhotra:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​सध्या तिच्या 'साम बहादूर' (Sam Bahadur Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. सान्या मल्होत्राने या बायोपिकमध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 'सॅम बहादूर' या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत असून त्याने फील्ड मार्शल सॅम माणेकशॉची भूमिका साकारली आहे. सध्या सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे सान्याचा डान्सचा (Sanya Malhotra) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सान्याने आपल्या बहिणीच्या संगीत सिरेमनीमध्ये जबरदस्त डान्स केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या सान्या मल्होत्राच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट्स केल्या जात आहेत. सान्या मल्होत्रा ​​तिची बहीण शगुन मल्होत्राच्या संगीत सिरेमनीमध्ये डान्स करताना दिसत आहे. सान्याचा हा हटके डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ते तिच्या डान्सचे खूपच कौतुक करत आहेत.

Sanya Malhotra Dance Video
Bigg Boss 17: एकाच वेळी दोन मुलींना..., आयशा खानचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

व्हायरल होणाऱ्या सान्या मल्होत्राच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ब्लॅक कलरच्या चमकदार साडी परिधान केलेली सान्या मल्होत्रा ​​तिची बहीण शगुन मल्होत्राच्या संगीत सिरेमनीमध्ये डान्स करत आहे. सान्या मल्होत्रा शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटातील 'वन टू थ्री फोर गेट ऑन द डान्स फ्लोअर' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सान्यासोबत आणखी एक व्यक्ती डान्स करताना दिसत आहे. सान्या मल्होत्राचा हा डान्स व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सान्या मल्होत्राने केलेल्या डान्सने या संगीत सिरेमनीची शान आणखी वाढली. सान्याच्या ड्रेसिंग स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधू घेतले.

Sanya Malhotra Dance Video
Vidyut Jammwal: न्यूड फोटोशूटमुळे विद्युत जामवाल ट्रोल, नेटिझन्सनी म्हणाले रणवीर सिंगसोबत राहण्याचा परिणाम

सान्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, याषी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​दिसली होती. मेघना गुलजार दिग्दर्शित सान्या मल्होत्राचा 'साम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'साम बहादूर' या चित्रपटाची टक्कर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाशी झाली होती. ज्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे. हळूहळू का होईना हा चित्रपट कमाई करत आहे.

Sanya Malhotra Dance Video
Ajinkya Nanaware: मालिकांनंतर अजिंक्य ननावरेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री, 'सोंग्या'मध्ये साकारणार लक्षवेधी भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com