Sanya Malhotra Oops Moment
Sanya Malhotra Oops MomentInstagram @sanyamalhotra_

Sanya Malhotra Video: अगं पोरी जरा हळू चाल! सान्या मल्होत्रा फोटोसाठी उभी राहिली अन् धडपडली, बघा VIDEO

Sanya Malhotra: प्रसिद्धी झोतात असलेल्या सान्या अनेकदा पापाराझींच्या कॅमेरात कैद होते.
Published on

दबंग गर्ल सान्या मल्होत्रा 'जवान' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सान्या मल्होत्राच्या 'जवान' चित्रपटातील अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसिद्धी झोतात असलेल्या सान्या अनेकदा पापाराझींच्या कॅमेरात कैद होते. नुकतीच सान्या मुंबईतील एका मॅगझीन इव्हेंट दरम्यान स्पॉट झाली.

सान्या मल्होत्रा यावेळी खूपच ग्लॅमरस दिसत होती. दरम्यान सान्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सान्याने स्वतःला 'उप्स मुमेंट' शिकार होण्यापासून वाचवलं आहे.

सान्या मल्होत्रासह अनेक सेलिब्रिटींना ब्रँचसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सर्व सेलिब्रिटी ग्लॅमरस लूकमध्ये अवतरले होते. सेलिब्रिटींना कॅमेरात कैद कारणासाठी पापाराझीं देखील तिथे उपस्थित होते.

सान्या मल्होत्राने देखील पापाराझींसमोर फोटोसाठी पोज दिली. परंतु ती तिकडे जाताच जमिनीवर असलेल्या छोट्या छोट्या खड्यांवरून घसरली. स्वतःला सावरत ती खूप आत्मविश्वासाने उभी राहिली आणि पापाराझींसमोर फोटोसाठी पोज दिल्या. सान्या पेन्सिल हील्स असलेली सँडल घातली होती.

परंतु सान्यी तिच्या हील्समुळे सरकली तर त्या खड्यांमुळे घसरली. कारण तिच्या मागून येणारी आणखी एक महिला देखील त्या खड्यांमुळे घसरली. पण सान्याने ज्याप्रकारे स्वतःला सावरले त्यामुळे तिचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

सान्या मल्होत्रा लूक

सान्या मल्होत्राने यावेळी सॅटिनचा न्यूड रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावर त्याच रंगाची सॅंडल घातली होती. फुफ स्लीव्ज असलेल्या या ड्रेसला स्वीटहार्ट नेकलाईन होती. सान्याने मिडल पार्टीशन करून केसांचा बन बांधला होता. तर कानात गोल्डन रंगाचे कानातले घातले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com