Sidharth Malhotra Announcement: सिद्धार्थ मल्होत्रा कियारासोबत लग्नाची घोषणा करणार? इंस्टाग्रामवर स्वत: दिली माहिती

Sidharth Malhotra Announcement: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Siddharth Malhotra will make a big announcement tomorrow
Siddharth Malhotra will make a big announcement tomorrowSAAM TV

Sidharth Malhotra Announcement: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या क्यूट कपलने एकत्र एक चित्रपटही केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा आहेत. परंतु आता ते लवकरच लग्न करण्याची शक्याता आहे. सिद्धार्थने (Sidharth Malhotra) आज त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे.

Siddharth Malhotra will make a big announcement tomorrow
Actress Wedding: ३५ वर्षीय अभिनेत्रीने केले दहाव्यांदा लग्न, फोटो पाहून फॅन्स हैराण

या पोस्टमध्ये त्याने उद्या एक बोल्ड अनाउन्समेंट करणार असल्याचे सांगितले आगे. त्याच्या या पोस्टनंतर सिद्धार्थ आणि कियाराच्या चाहत्यांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तो उद्या कियारासोबत लग्नाची (Sidharth Kiara Marriage) घोषणा करू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. तर अनेक लोकांनी तो नवीन ब्रँडसोबत जोडला असेल आणि ही घोषणा त्याच्याशी संबंधित असू शकते, असाही अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा (Kiara Advani) या जोडप्याने त्यांच्या बाजूने अद्याप त्यांच्या नात्याविषयी आणि लग्नाविषयी अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु मीडियातील बातम्यांवर विश्वास ठेवला तर हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु प्रसारमाध्यमांशी बोलताना दोघांनी लग्नाबाबतचा विषय अनेकदा टाळला आहे.

Siddharth Malhotra will make a big announcement tomorrow
Rakhi Sawant: राखीला 'तो' व्हिडिओ इन्स्टाग्राम शेअर करणं पडलं महागात; नेटकऱ्यांनी साधला जोरदार निशाणा

या सर्व चर्चांदरम्यान सिद्धार्थने आज एक महत्त्वाची इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. उद्या सिद्धार्थ कियारासोबत लग्नाची घोषणा करणार असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत असले तरी तो नेमकं काय सांगणार आहे हे उद्याच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com