Actress Wedding: ३५ वर्षीय अभिनेत्रीने केले दहाव्यांदा लग्न, फोटो पाहून फॅन्स हैराण

टीव्ही अभिनेत्रीने दहाव्यांदा लग्न केल्याचा खुलासा केला आहे.
Shraddha Arya
Shraddha AryaInstagram @sarya12

Actress Shraddha Arya 10th Wedding: टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. गेल्या काही वर्षांपासून 'कुंडली भाग्य' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत 'प्रीता' ही भूमिका साकारत आहे. तिचा अभिनय, निरागसता लोकांना आवडते. श्रद्धाचे गेल्या वर्षी राहुल नागलशी लग्न झाले. परंतु श्रद्धा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

श्रद्धा आर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. श्रद्धा नेहमीची तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. तिचे फॅन्स पोस्टला तुफान प्रतिसाद देतात. दरम्यान, अभिनेत्रीने असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Shraddha Arya
दीपिका पादुकोण 'पठाण' च्या कामात व्यग्र, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

श्रद्धाने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. तसेच तिने कॅप्शनमध्ये 10 व्यांदा लग्न केल्याचा खुलासा केला. श्रद्धाने तिचा नववधूचा लूकही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण या फोटोंमध्ये पती राहुल नागलसोबत नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीसोबत दिसत आहे. श्रद्धाचा १० वा नवरा शक्ती अरोरा आहे, जो तिचा सहकलाकार देखील आहे.

श्रद्धाने शेअर केलेले फोटो 'कुंडली भाग्य' या मालिकेच्या सेटवरील आहेत. स्क्रिप्टच्या मागणीनुसार मालिकेत लग्नाचा दाखवण्यात येणार आहे. त्याच दरम्यानचे हे फोटो शेअर करत श्रद्धाने खुलासा केला की, त्याच शोमध्ये तिचे हे दहावे लग्न आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर 2015 मध्ये श्रद्धा एनआरआय उद्योगपती जयंत रत्तीसोबत लग्न करणार होती. परंतु साखरपुड्यानंतर काही महिन्यांनी त्यांचे लग्न मोडले. श्रद्धाने 2021 मध्ये नौदल अधिकारी राहुल नागलशी लग्न केले. श्रद्धा पती राहुलसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com