दीपिका पादुकोण 'पठाण' च्या कामात व्यग्र, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

दिपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या स्क्रिप्टचा एक फोटो शेअर केला आहे.
Deepika Padukone
Deepika PadukoneSaam TV

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र शिवा' चित्रपटानंतर पठाण चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती शाहरुख खानच्या (Sharukh Khan) बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाच्या डबिंगच्या कामात व्यग्र आहे. या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. नुकताच दिपिकाने सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे.

Deepika Padukone
Sunny Deol Chup : पत्रकार परिषदेत पत्रकार प्रश्न विचारत होता, अचानक रागाने ओरडला सनी देओल!

दिपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या स्क्रिप्टचा एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने 'पठाण' असा उल्लेख केला. दीपिका पदुकोणच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. तिच्या एका चाहत्याने 'बॉलीवूडचा दुष्काळ संपेल', तर दुसर्‍या यूजरने 'पठाणबद्दल उत्साही.' आणखी एकाने 'आणखी प्रतीक्षा करू शकत नाही!' असे म्हटलं आहे.

Deepika Padukone
VIDEO:राजू श्रीवास्तवबद्दल विचारल्यानंतर कॅमेरामनवर भडकली तापसी

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण चित्रपटात जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी ऑगस्टमध्ये अभिनेत्यांचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करून चाहत्याची चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली होती. काही दिवसापूर्वी दीपिका पदुकोण देखील तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्टारकास्टचे फोटो शेअर केले होते.

शाहरुख खानने जूनमध्ये 'पठाण' चित्रपटातील त्याचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख स्पष्ट केली होती. त्याने " २५ जानेवारी २०२३ रोजी यशराज फिल्म्ससोबत 'पठाण' चा आंनद घ्या" असे म्हटलं होते. पठाण हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com