Shah Rukh Khan Visits Vaishno Devi: 'जवान'च्या ट्रेलर रिलीजआधी शाहरुख खान वैष्णोदेवीच्या चरणी

Shah rukh Khan Viral Video: शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan At Vaishno Devi Mandir
Shah Rukh Khan At Vaishno Devi MandirSaam Tv

Shah Rukh Khan At Jawan Audio Launch:

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून येत्या ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी शाहरुख खानने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहेत. शाहरुख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'पठान' चित्रपट प्रदर्शित होण्याआधी देखील शाहरुखने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. तसेच तो उमराह करण्यासाठी देखील गेला होता.

Shah Rukh Khan At Vaishno Devi Mandir
TRP Rating Of Marathi Serial: 'टीआरपी'मध्ये स्टार प्रवाहच्या मालिका अव्वल; 'ठरलं तर मग!' पाठोपाठ 'आई कुठे काय करते' टॉपला

शाहरुख खान वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेला असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खानने सफेद शर्टवर निळी हुडी घातली आहे. कोणी त्याला ओळखू नये याच्यासाठी हुडी आणि मास्कने त्याने तोंड लपवले आहे. त्याच्यासह भरपूर सिक्युरिटी दिसत आहे.

मंगळवारी रात्री शाहरुख खान वैष्णोदेवीला गेला होता. दरम्यान शाहरुख खानने स्वतःची ओळख लपविण्याचा प्रत्यत्न केला असला तरी काही लोकांना त्याची ओळख पटली आहे.

शाहरुख खानच्या जवानचा आज ऑडिओ लाँच सोहळा चेन्नईत पार पडणार आहे. वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन शाहरुख तिथे पोहोचला आहे. उद्या जवानची संपूर्ण टीम दुबईला जाणार आहे. दुबईतील बुर्ज खलिफा येथे जवानचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

जवान चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अॅटली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुखसह नयनतारा, प्रियामानी, सान्या मल्होत्रा देखील दिसणार आहेत. तसेच दीपिका पदुकोण आणि थलापती विजय या चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com