Bhau Kadam च्या दर्शनासाठी भली मोठी रांग, नेमकं आहे तरी काय 'एकदा येऊन तर बघा'

Bhau Kadam New Movie: 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटामध्ये (Ekada Yevun Tar Bagha Movie) भाऊ कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Bhau Kadam
Bhau KadamSaam Tv

Ekada Yevun Tar Bagha Movie:

'चला हवा येऊ द्या'च्या (chala hawa yeu dya) माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा अभिनेता भाऊ कदमची (Bhau Kadam) नेहमीच चर्चा होत असते. आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना हसवणाऱ्या भाऊ कदमचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. भाऊ कदमच्या प्रत्येक भूमिकांकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असते.

भाऊ कदम आता लवकरच एका नव्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटामध्ये (Ekada Yevun Tar Bagha Movie) भाऊ कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी तयार झाला आहे. या चित्रपटामध्ये भाऊ कदम नेमकी काय भूमिका साकारणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'एकदा येऊन तर बघा'मध्ये भाऊ कदम -

भाऊ कदम हा सर्वांचा आवडता कलाकार आहे. त्याची भेट व्हावी, त्याच्यासोबत फोटो काढावा असे प्रत्येकाला वाटत असते. अशामध्ये भाऊ कदमच्या दर्शनासाठी लोकांच्या लांब रांगा लागल्या आहेत असं जर तुम्हाला सांगितले तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. पण यामागचे नेमकं कारण तर काय आहे. भाऊ कदमचे दर्शन घेण्यासाठी लोकं का येत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहेत. ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात भाऊ कदम एका खास भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील भाऊ कदमचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

साकारणार बाबा गुलाबी गरमची भूमिका -

'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटामध्ये भाऊ कदम ‘बाबा गुलाबी गरम’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या भूमिकेतून देखील भाऊ कदम प्रेक्षकांना हासवणार आहे. अडचणीत असलेल्या भक्तांना मार्गदर्शन देणारे ‘बाबा गुलाबी गरम’ यांची लीला या चित्रपटामध्ये खूपच हासवणारी असणार आहे. या चित्रपटामध्ये भाऊ कदम दिसणार हे कळताच त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत.

Bhau Kadam
Parineeti Chopra चे सासरचं घर आहे खूपच आलिशान, अभिनेत्रीने शेअर केले इनसाइड फोटो

एकापेक्षा एक जबरदस्त विनोदवीर -

लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये भाऊ कदमसोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने आणि सुशील इनामदार असे एकापेक्षा एक जबरदस्त विनोदवीर या चित्रपटात दिसणार आहेत. ८ डिसेंबरला 'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Bhau Kadam
Dunki रिलीज होण्यापूर्वी किंग खानने चाहत्यांना दिला जबरदस्त सल्ला, म्हणाला - 'सीट मिळणार नाही म्हणून घरातूनच...'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com