Marathi Movie Poster: प्रसाद खांडेकर यांची खुशखुशीत मेजवानी; 'एकदा येऊन तर बघा'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

Ekda Yeun Tar Bagha Poster Out: 'एकदा येऊन तर बघा' असे या चित्रपटाचे नाव या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
Prasad Khandekar 1st Movie
Prasad Khandekar 1st MovieSaam TV

Ekda Yeun Tar Bagha Marathi Movie:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित पाहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२२ साली ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाची घोषणा झाली होती.

'एकदा येऊन तर बघा' असे या चित्रपटाचे नाव या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर पाहून चित्रपटामध्ये हास्याची मेजवानी मिळणार हे नक्की.

Prasad Khandekar 1st Movie
Thalapathy Vijay Movie Poster: 'शांत राहा आणि संघर्ष टाळा...' थलापती विजयच्या 'लिओ' चित्रपट पोस्टर प्रदर्शित

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'खुशखुशीत नवीन प्रोजेक्ट, अस्सल मराठमोळ्या कॉमेडीचा तडका मारलेली, लहान-मोठे सगळयांना पोट भरून हसवणारी, २४ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहात सुरु होतेय मनोरंजनाची हमखास गॅरंटी असलेली भरपेट मेजवानी; ‘एकदा येऊन तर बघा’, रिटर्न जाणार नाही !

'एकदा येऊन तर बघा' च्या मोशन पोस्टरची सुरुवात विशाखा सुभेदारपासून होते. त्यानंतर चित्रपटातील इतर पात्र आपल्यासमोर येतात. सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने आणि गिरीश कुलकर्णी अशी दमदार कलाकारांची फौज या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये आपल्याला अतरंगी अवतारात दिसत आहे. (Celebrity)

'एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणार नाही' या चित्रपटाचे नाव आणि कलाकार पाहून चित्रपटात कसा हे आपल्या लक्षात येईल. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी देखील चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 'लेखक दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा "एकदा येऊन तर बघा" रिटर्न जाणार नाही 24 नोव्हेंबर पासून सिनेमागृहात' असे कॅप्शन प्रसाद खांडेकर यांनी या पोस्टला दिले आहे.

तंगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट तगडा असेल अशी कमेंट नेटकरी करत आहेत. तसेच प्रसाद खांडेकरचे पहिल्या चित्रपटासाठी अभिनंदन करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com