Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Pushpa 2 The Rule Film : ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालेलं आहे. गाण्याचं नाव ‘पुष्पा पुष्पा’ असं आहे.
Pushpa Pushpa Song
Pushpa Pushpa SongSaam Tv

Pushpa Pushpa Song

सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा २: द रुल’ची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता टीझरनंतर चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं रिलीज झालेलं आहे. गाण्याचं नाव ‘पुष्पा पुष्पा’ असं आहे. हे टायटल साँग असून गाण्याला सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळतोय. गाण्यामध्ये पुष्पाच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

Pushpa Pushpa Song
Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

अल्लू अर्जुनने गाण्यामध्ये हेयर हायलाईट्स, प्रिंटेड शर्ट्स, फॉर्मल पँट, ज्वेलरी आणि हटके शूज असा तिने लूक केलेला दिसत आहे. त्याच्या प्रिंटेड शर्टावर रक्ताने माखलेला हातही पाहायला मिळत आहे. पुष्पाचा ह्या गाण्यात वेगवेगळे अंदाज दिसत आहे. हे गाणं ६ भाषांमध्ये रिलीज झालेलं आहे. हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि बंगाली अशा सहा भाषेत हे गाणं रिलीज झालेलं आहे. देवी श्री प्रसाद यांनी लिहिलेल्या गाण्याच्या वेगवेगळ्या व्हर्जनसाठी नकाश अझीझ, दीपक ब्लू, मिका सिंग, विजय प्रकाश, रणजीत गोविंद आणि तिमिर बिस्वास यांसारख्या लोकप्रिय गायकांचा आवाज आहे.

Pushpa Pushpa Song
Rupali Ganguly Joins BJP: मोठी बातमी! 'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, हाती घेतले कमळ

पुष्पाच्या हूक स्टेप्सची नेटकऱ्यांना भुरळ पडली असून नेटकरी सध्या ह्या गाण्यावर तुफान रिल्स बनवत आहेत. चित्रपटामध्ये पुष्पाचं वागणं कसं असेल एकंदरित आपल्याला ह्या गाण्यातून पाहायला मिळेल. सध्या ह्या गाण्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसते. ‘पुष्पा २: द रुल’ मधील ‘पुष्पा पुष्पा’ ह्या पहिल्या गाण्याला मिका सिंग आणि नकाश अजीझ यांनी आवाज दिला आहे. तर देवी श्री प्रसाद यांनी हे गाणं लिहिलं आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे. प्रमुख भूमिकेत अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानासह फहाद फाझील, जगदीश भंडारी, प्रकाश राजही दिसणार आहे.

Pushpa Pushpa Song
Viral Dance Video: नवरा बायकोची जबरदस्त जुगलबंदी; 'छोकरा जवां' गाण्यावरील डान्सचा VIDEO जोरदार व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com