Viral Dance Video: नवरा बायकोची जबरदस्त जुगलबंदी; 'छोकरा जवां' गाण्यावरील डान्सचा VIDEO जोरदार व्हायरल

Husband And Wife Dance Viral Video: अनेक नात्यातील एक सुंदर नातं म्हणजे पती-पत्नीचं. सगळ्या नात्यांपैकी यांच नातं फार अनमोल असतं, असं म्हटलं जात. सोशल मीडियावर पती-पत्नीसंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत
Viral Dance Video:
Viral Dance Video: Canva

अनेक नात्यातील एक सुंदर नातं म्हणजे पती-पत्नीचं. सगळ्या नात्यांपैकी यांच नातं फार अनमोल असतं, असं म्हटलं जात. सोशल मीडियावर पती-पत्नीसंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत, त्यात कधी नवरा- बायकोच्या(Husband-Wife) वादविवादाचे तर कधी बायकोसाठी लाईटच्या टॉवर चढलेल्या नवऱ्याचे.

Viral Dance Video:
Viral Video: वह्या, पुस्तक, बँच बाय बाय; गरम होत असल्याने शाळेने वर्गात विद्यार्थ्यांसाठी बनवला स्विमिंग पूल

अशा व्हिडिओमधून दोघांचे एकमेंकावर असलेले प्रेमही आपल्याला दिसून येते. सध्या सोशल मीडियावर पती-पत्नीच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका कार्यक्रमात दोघांनी असा डान्स केलाय,जो पाहून तुम्हीही म्हणालं असाचं जोडीदार पाहिजे. यांच्या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

कोणताही शुभ प्रसंग आला की,डान्स आलाच. विविध कार्यक्रमात आपल्याला पती-पत्नी, तर कधी भांवडे आणि कधी संपूर्ण कुटुंब डान्स करताना दिसून येतात.अशात व्हायरल व्हिडिओमध्ये पती-पत्नीने एकदम भारी डान्स करताना दिसून येते आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीस पती बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या पत्नीच्या हाताला धरुन तिला पुढे आणतो. तेवढ्यात गाणे सुरु होते. मग काय..दोघं डान्स करण्यासाठी असे तयार होतात की फक्त हे निमित्त त्यांना पाहिजे होते.

दोंघजण डान्स करताना अतिशय उत्तम पद्धतीने ताळमेल साधत आहेत. त्यांचा डान्स इतका अप्रतिम असतो की, आजूबाजूल असलेल्या लोकांना टाळ्याचा आणि शिट्ट्याचा वर्षाव (Appreciation)करत आहेत. दोघांनी हिंदीतील 'छोकरा जवां' या गाण्यावर डान्स केला आहे.

या पती-पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @Gulzar_sahabया अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच असंख्य प्रतिक्रिया व्हिडिओवर आल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' असा जोडीदार मला ही मिळो',तर आणखी यूजर्संनी दोघांच्या डान्सचे कौतूकही केले आहे.

Viral Dance Video:
Viral Video : सायकलवरून जाताना आईसमोरच चिमुकलीवर कुत्र्याने केला हल्ला; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com