Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video : सायकलवरून जाताना आईसमोरच चिमुकलीवर कुत्र्याने केला हल्ला; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Dog Attack Viral Video CCTV Footage : सोशल मीडियावर एका चिमुकलीवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Published on

शहरांमध्ये अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. आता देखील सोशल मीडियावर एका चिमुकलीवर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Viral Video
Girls Fight Video: रिल्सच्या कमेंटवरून पोरींमध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी हाणामारी करत भर रस्त्यातच भिडल्या, VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन फिरण्यासाठी आली आहे. महिलेने लहान मुलाला हाताशी धरलं आहे. तर तिची मुलगी रस्त्यावर सायकल चालवत आहे. सायकल चालवताना रस्त्यावर आणखी एक महिला आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फिरण्यासाठी आलेली असते.

सायकलवरून जात असताना कुत्रा चिमुकलीच्या शेजारी येतो आणि तिच्यावर जोरजोरात भुंकू लागतो. कोणी काही करणार तितक्यात कुत्रा तिच्यावर हल्ला करतो. कुत्रा आपल्या मुलीला चावत आहे हे तिची आई समोरून पाहते. कुत्र्याने केलेला हल्ला पाहून आई धावत आपल्या मुलीजवळ येते आणि तिला कुत्र्याने जास्त जखमी करण्याआधीच सोडवते.

त्यानंतर आई तिथे असलेल्या एका सेक्युरीटी गार्डला बोलावते. अगदी २ मिनीटांचा हा थरार पाहून तेथील सर्वच व्यक्तींच्या काळजात धडकी वाढते. महिलेने आपल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला पकडलेलं असताना देखील कुत्रा चिमुकलीच्या अंगावर धावून जातो. जर वेळीच मुलीची आई तेथे धावत आली नसती तर मुलीला मोठी दुखापत होण्याची शक्यता होती.

सोशल मीडियावर @AbhishekKumarJatav या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये कुत्र्याने चिमुकलीच्या हाताचा चावा घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करत ही घटना गाझियाबादमधील असल्याचं या व्यक्तीने सांगितलं आहे. तसेच पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरण्यासाठी आणल्यावर काही नियम आणि अटी लागू करणं गरजेचं आहे, असंही कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय.

Viral Video
Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com