Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

Delhi Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, चर्चेत येण्यासाठी तरुण- तरुणी नको ते स्टंट करत असतात. अनेकदा अशी स्टंटबाजी महागातही पडते.
Delhi viral Video
Delhi viral VideoSaamtv

सोशल मीडियावर रिल्स स्टार, सेलिब्रेटींची संख्या वाढत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, चर्चेत येण्यासाठी तरुण- तरुणी नको ते स्टंट करत असतात. अनेकदा अशी स्टंटबाजी महागातही पडते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

सध्या तरुणाईमध्ये सोशल मीडियावर चर्चेत येण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, रातोरात स्टार होण्यासाठी तरुण- तरुणी जगावेगळा कंटेट शोधण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात.

अनेकदा अशा हौशी तरुण- तरुणींमुळे मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या दिल्लीच्या जीटी कर्नल रोडवरील असाच एक संतापजनक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण चक्क भररस्त्यात खुर्ची टाकून बसल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तरुणावर कडक कारवाई केली आहे.

Delhi viral Video
Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज?

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ सुरू आहे. अशातच एक तरुण आपली गाडी थांबवतो आणि खुर्ची टाकून रस्त्याच्या मधोमध बसतो. तरुणाचा हा प्रताप पाहून येणारे- जाणारे वाहनचालकही आश्चर्याने बघत आहेत. दरम्यान, या घटनेची दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तरुणाला अटक केली आहे. विपीन कुमार असे या तरुणाचे नाव आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Delhi viral Video
Harsul Sawangi Road Accident: बाईकवरून तोल गेला अन् महिला खाली कोसळली; पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com