Harsul Sawangi Road Accident: बाईकवरून तोल गेला अन् महिला खाली कोसळली; पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं

Woman killed In Crushed By Tractor: छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सूल सावंगी येथे झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Harsul Sawangi Road Accident
Harsul Sawangi Road AccidentYandex

रामनाथ ढाकणे साम टिव्ही, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) हर्सूल सावंगी येथे झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही महिला तोल जाऊन दुचाकीवरून खाली कोसळली. खाली पडल्यानंतर तिला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने (Harsul Sawangi Road Accident) चिरडलं. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल सावंगी येथे बाईकवरून जाणाऱ्या महिलेचा तोल सुटून ती महिला जमिनीवर कोसळली. तेव्हा पाठीमागून एक ट्रॅक्टर येत होता. महिला खाली पडताच या मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने तिला (Woman Crushed By Tractor) चिरडले. यामध्ये महिला जागीच ठार झाली आहे. हा अपघात आज २९ एप्रिल रोजी घडला आहे.

ही घटना हर्सूल पोलीस स्टेशन समोर घडली (Chhatrapati Sambhaji Nagar News) आहे. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात केलं आहे. महिलेचं नाव अद्याप स्पष्ट नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Harsul Sawangi Road Accident
Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

सुभद्राबाई सांडू काळे (वय वर्ष 75) असं मृत महिलेचे नाव (Road Accident) आहे. ही महिला छत्रपती संभाजी नगर शहरातून फुलंब्रीच्या दिशेने जात असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. उत्तरीय तपासणीसाठी या महिलेचा मृतदेह शहरातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात (Accident News) आला आहे. हरसुल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Harsul Sawangi Road Accident
Accident News : अपघात घडल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नांत चालकाची पादचारी, दुचाकीस्वारस धडक; दाेन ठार, पाच गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com