Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Chhattisgarh Accident News: भरधाव वेगात असलेल्या पिकअपने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.
Chhattisgarh Accident News
Chhattisgarh Accident NewsSaam TV

Chhattisgarh Accident News

भरधाव वेगात असलेल्या पिकअपने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २३ जण गंभीर जखमी झाले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना छत्तीसगडच्या बेमेटारा परिसरात रविवारी (ता. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Chhattisgarh Accident News
UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

मृतांमध्ये ५ महिला ३ मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती पाथरा गावातील रहिवासी असून ते धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. पिकअपमधून जवळपास ३० ते ३५ जण प्रवास करीत होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना बेमेटारा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे पिकअप अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला जाऊन धडकला. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता.

दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Chhattisgarh Accident News
Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com