Rupali Ganguly Joins BJP: मोठी बातमी! 'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, हाती घेतले कमळ

Anupama Fame Actress Rupali Ganguly: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या मालिकेतून अभिनेत्री रूपाली गागुंली प्रेक्षकांसमोर आली होती. आज रूपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Rupali Ganguly Joins BJP
Rupali Ganguly Joins BJPSaam Tv

प्रमोद जगताप साम टिव्ही, नवी दिल्ली

अनुपमा फेम अभिनेत्री रूपाली गांगुलीच्या (Rupali Ganguly) चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. रूपाली गांगुलीने हाती कमळ घेतल्याची माहिती मिळत आहे. तिने आज पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये रूपाली गांगुलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई (Sarabhai VS Sarabhai) या मालिकेतून अभिनेत्री रूपाली गागुंली समोर आली होती. आज रूपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

रूपाली गांगुलीसोबत अमेय जोशी यांनीही आज भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रूपाली गांगुली राजकारणात उतरली आहे. रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेत काम करत (Rupali Ganguly Joins BJP) आहे. स्टार प्लसवरील ही मालिका सध्या खूप चर्चेमध्ये आहे. सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीचं वार वाहत आहे. अनेक अभिनेते , अभिनेत्री सध्या राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत.

पक्षप्रवेश झाल्यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Anupama Fame Actress Rupali Ganguly) माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांची मी मोठी चाहती आहे. विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही यात सहभागी असलं पाहिजे, असं वाटतं. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया रूपाली गांगुलीने व्यक्त केली आहे. सध्या रूपालीची अनुपमा भूमिका फार चर्चेत आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद तिला मिळत आहे.

Rupali Ganguly Joins BJP
Lok Sabha Election 2024: मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार का? अभिनेते Govinda यांचं उत्तर समोर!

यावेळी बोलताना विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी रूपाली गांगुली आणि अमेय जोशी (Amey Joshi) या दोघांचंही भाजपमध्ये स्वागत केलं आहे. तावडे म्हणाले की, विरोधी पक्ष त्यांच्या प्रचारात खोटं पसरवत आहे. 'मत जिहाद' पर्यंत काँग्रेस आता पोहोचलं आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जागचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Rupali Ganguly Joins BJP
Actor Prakash Raj: पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे ३ पक्ष मला तिकीट देण्यासाठी आतुर- अभिनेता प्रकाश राज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com