Actor Prakash Raj: पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे ३ पक्ष मला तिकीट देण्यासाठी आतुर- अभिनेता प्रकाश राज

Prakash Raj On Loksabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीपूर्वी अभिनेता प्रकाश राजने (Prakash Raj) मोठं वक्तव्य केलंय. पंतप्रधान मोदींवर करत असलेल्या टिकेमुळं तीन राजकीय पक्ष त्यांना निवडणूकीचं तिकीट देण्यास आतुर असल्याचं त्यांनी सांगितलं (Loksabha Elections 2024) आहे.
Prakash Raj
Prakash Raj Saam Tv
Published On

Actor Prakash Raj Critic PM Modi

अभिनेता प्रकाश राजने आजच्या राजकीय परिस्थितीवर (Loksabha Elections 2024) भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आजच्या राजकीय पक्षांनी आपला आवाज गमावला आहे. त्यांच्यात सत्यता उरलेली नाही. त्यामुळंच अनेक पक्ष उमेदवार शोधण्यासाठी सतत धडपडत आहेत. या देशात आता खंबीर उमेदवार नाहीत. आता मतदारसंघासाठी प्रतिनिधी शोधण्यासाठी राजकीय पक्ष संघर्ष करताना दिसत आहेत. (latest marathi news)

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections 2024) राजकीय पक्षांकडून निवडणुकीची समीकरणे तयार होऊ लागली आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष मोठ्या चेहऱ्यांच्या शोधात व्यस्त आहेत. चित्रपट अभिनेते प्रकाश राज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्र सरकारविरोधात उघडपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. आता याच अभिनेत्याने (Prakash Raj ) मोठा दावा केला आहे की, अनेक राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवार उभं करण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहेत, कारण ते उघडपणे पंतप्रधान मोदींना विरोध करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेता प्रकाश राज यांनी सांगितलं आहे की, तीन राजकीय पक्ष त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार बनवण्यासाठी त्यांच्या मागे लागले आहेत. पण याचे कारण त्यांची विचारधारा नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार आहेत, हे आहे. कोझिकोड येथे आयोजित केरळ लिटरेचर फेस्टिव्हल (KLF) मध्ये प्रकाश राज म्हणाले की, मला या सापळ्यात अडकायचं नाही.

'स्टार पॉवर आणि स्टेट-क्राफ्ट: पब्लिक पर्सोना आणि इलेक्टोरल पॉलिटिक्स' या विषयावरील सत्रादरम्यान ते (Prakash Raj) म्हणाले, आता पुन्हा निवडणुका येत आहेत, तीन राजकीय पक्ष माझ्यामागे आहेत. मी माझा फोन बंद केला आहे, कारण मला यात पडायचं नाही. प्रकाश राज त्यांच्या दमदार भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार जिंकलेले आहेत. ते कांचीवरम, सिंघम आणि वॉन्टेडसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्याच्या चमकदार कामगिरीसाठी ओळखले जातात. त्यांनी मागील लोकसभा निवडणूकही (Loksabha Elections 2024) लढवली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा (Prakash Raj) पराभव झाला.

Prakash Raj
Agastya Nanda On Amitabh Bachchan: 'आजोबा मला सुपरस्टार वाटत नाहीत', अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अगस्त्या नंदा असं का म्हणाला?

राजकीय पक्षांना संघर्ष करावा लागतोय

आजच्या राजकीय पक्षांचा आवाज कमी झाला असून त्यात सत्यता उरलेली नाही. त्यामुळेच अनेक पक्ष (पक्ष) उमेदवार शोधण्यासाठी सतत धडपडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, या देशात आता उमेदवारही नाहीत. कोणत्याही मतदारसंघासाठी प्रतिनिधी शोधण्यासाठी राजकीय पक्षांना सतत संघर्ष करावा लागतो. आपण किती असहाय्य झालो आहोत, असा सवालही यावेळी त्यांनी (Prakash Raj) उपस्थित केलाय.

ते पंतप्रधान मोदींचा द्वेष करतात का असा प्रश्न त्यांना विचारला गेला. यावर प्रकाश राज म्हणाले, मी पंतप्रधान मोदींचा (PM Modi) तिरस्कार करत नाही. ते माझे सासरे नाही की, माझा त्यांच्याशी काही मालमत्तेचा वाद नाही. मी त्यांना फक्त त्यांचं काम करायला सांगतोय, असंही ते म्हणाले.

Prakash Raj
Kangana Ranaut Viral Post: बॉलिवूड अवॉर्ड म्हणजे निव्वळ फसवणूक.. म्हणत कांगनाने व्यक्त केला संताप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com