Kangana Ranaut Viral Post: बॉलिवूड अवॉर्ड म्हणजे निव्वळ फसवणूक.. म्हणत कांगनाने व्यक्त केला संताप

कंगना रनौत पुन्हा एकदा नेपोटिझमवर राग व्यक्त केला आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Saam TV

Kangana Ranaut Tweet On Nepotism: मुंबईमध्ये काल दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. अनेक कलाकारांना या सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगना रनौत पुन्हा एकदा नेपोटिझम भाष्य केले आहे.

कंगना रनौत पुन्हा एकदा नेपोटिझमवर राग व्यक्त केला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, अभिनेत्रीने स्वतःच विजेत्यांची एक लिस्ट जाहीर केली आहे. 2023च्या या पुरस्कारांसाठी एसएस राजामौली यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची नावांच्या या लिस्टमध्ये तिने समावेश केला आहे.

कंगनाने तिच्या लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या कलाकारांना पुरस्कार मिळायला पाहिजे होता असे आहे. तसेच नॅपो माफिया सर्वांचे हक्क हिरावून घेत असल्याचेही तिने सांगितले आहे.

Kangana Ranaut
Urfi Javed With Rohit Shetty: स्प्लिट्सव्हिलानंतर उर्फी पुन्हा दाखवणार जलवा, 'खतरो के खिलाडी १३' मध्ये करणार हटके कारनामे

कंगना तिचे मत मांडणारी एक पोस्ट तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात तिने म्हंटले आहे की, 'अवॉर्ड्सचा सीझन सुरू झाला आहे आणि नेपो माफिया पुन्हा एकदा प्रतिभावंतांकडून सर्व पुरस्कार हिसकावून घेत आहेत. कलात्मकतेचे तेज दाखविणाऱ्या आणि 2022 च्या पुरस्कारावर मालकी असणाऱ्या काहींची यादी येथे आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी (कंतारा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मृणाल ठाकूर (सीता रामम)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- एसएस राजामौली (RRR)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अनुपम खेर (काश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - तब्बू (दृश्यम/भूल भुलैया)

बॉली अवॉर्ड्स ही एक मोठी फसवणूक आहे … जेव्हा मला माझ्या कामातून थोडा वेळ मिळेल तेव्हा मी त्या सर्वांची यादी तयार करेन जे मला पात्र वाटतात … धन्यवाद

यंदाच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांना सर्वात मोठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात सर्वोकृष्ट अभिनेता, अभिनेत्री आणि समीक्षकांच्या वादात अभिनेता या पुरस्कारांचा समावेश होता. या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कंगना रनौत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत नेपोटिझमवर संताप व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com