Urfi Javed With Rohit Shetty: स्प्लिट्सव्हिलानंतर उर्फी पुन्हा दाखवणार जलवा, 'खतरो के खिलाडी १३' मध्ये करणार हटके कारनामे

उर्फी जावेद 'खतरों के खिलाडी 13' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे.
Urfi Javed Is Getting Ready For Khatron Ke Khiladi Season 13
Urfi Javed Is Getting Ready For Khatron Ke Khiladi Season 13 Instagram @itsrohitshetty

Urfi Javed Participating In Khatron Ke Khiladi Season 13: अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अभिनयापेक्षा तिच्या कपड्यांमुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. 'बिग बॉस ऑनलाईन'मुळे उर्फीला ओळख मिळाली. उर्फी सोशल मीडिया सेन्सेशन आहे.

उर्फी नेहमीच वादात अडकते किंवा ट्रोल होते. उर्फी काहीही करी ती मेहमीच चर्चेत असते. उर्फी काहींना आवडते तर काहींना नाही. उर्फी तुम्हला आवडत असो व नसो पण तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.

Urfi Javed Is Getting Ready For Khatron Ke Khiladi Season 13
Alia Bhatt-Ranbir Kapoor Award: बॉलिवूडचं क्युट कपल ठरलं सर्वोकृष्ट अभिनेता-अभिनेत्री

उर्फी फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. तसेच ती तिच्या रिअॅलिटी शोमुळे देखील चर्चेचा विषय बनते. उर्फी 'बिग बॉस नंतर Splitsvilla X4 या रिअॅलिटी शोचा भाग झाली होती. आता उर्फी आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये जाण्याची तयारी करत आहे.

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया सेन्सेशन, Uorfi जावेद 'खतरों के खिलाडी 13' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. तिने नुकतीच शोच्या निर्मात्यांची भेट घेतली आहे. जर सर्व अटी-शर्ती मान्य झाल्या तर ती लवकरच चित्रपट निर्माता रोहित शेट्टीसोबत दिसेल. एका अॅक्शन शोमध्ये किंवा अॅक्शन अवतार उर्फीला याआधी कधीही पहिले नाही. उर्फी तिची धाडसी बाजू दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे.

उर्फी जावेद व्यतिरिक्त बिग बॉस 16 फेम शिव ठाकरे, अर्चना गौतम या रिअॅलिटी शोमधील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. रोहित शेट्टीने बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर शालीन भनोतला देखील हा शो ऑफर केला होता. परंतु त्याला फोबिया असल्याने शालीनने शो करण्यास नकार दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com