Salman Khan News : भाईजान अर्ध्या रात्री लंडनहून मुंबईत परतला; विमानतळावर पापाराझींची नजर चुकवत गाठलं घर

Salman Khan News : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान रात्री उशिरा लंडनमधून मुंबईमध्ये परतला आहे. मुंबई विमानतळावर स्पॉट झाला तेव्हा त्याने पापाराझींना दुर्लक्ष केले आहे.
Salman Khan News
Salman Khan Return To Home From LondonInstagram

Salman Khan Return To Home From London

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान रात्री उशिरा लंडनमधून मुंबईमध्ये परतला आहे. त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड शेरासोबत पोलिसांच्या सिक्युरिटीसोबत तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. अभिनेत्याने पापाराझींकडे दुर्लक्ष करत थेट त्याच्या बुलेटप्रुफ कारमधून घरी रवाना झाला. अभिनेता गेला काही दिवसांसाठी लंडनमध्ये होता. (Bollywood)

Salman Khan News
Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

नेमका तो लंडनमध्ये कोणत्या कारणासाठी गेला होता, हे काही कळू शकला नाही. अभिनेत्याच्या घरावर १४ एप्रिलला दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. तेव्हापासून अभिनेता कमालीचा चर्चेत आहे. तेव्हापासून अभिनेता कॅमेऱ्यासमोर फार कमी स्पॉट झाला आहे. (Salman Khan)

सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यापासून त्याचा हा परदेशातला दुसरा दौरा आहे. याआधी तो दुबईला गेला होता. यूकेचे खासदार बॅरी गार्डनर यांनी काल भाईजानची भेट घेतली होती. यावेळी युकेच्या खासदारांनी त्याच्यासोबत फोटो शेअर केला आहे. 'टायगर झिंदा है आणि सध्या तो लंडनमध्ये आहे.' असं कॅप्शन देत त्यांनी फोटो शेअर केला. (Viral Video)

भाईजानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीने आत्महत्या केली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्येच अनुप थापन नावाच्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्याचा उपचारादरम्यान जीटी रुग्णालयात मृत्यू झालाय. त्याने शौचालयातील खिडकीला चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. (Entertainment News)

Salman Khan News
Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com