Pathaan 2 Movie: शाहरुख खान आणि आदित्य चोप्राने केली हात मिळवणी, 'पठान २'मधून घालणार धुमाकूळ

Shah Rukh Khan: 'पठान'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता 'पठान २' चित्रपट (Pathaan 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
Pathaan 2 Movie
Pathaan 2 MovieSaam Tv

Shah Rukh Khan Upcoming Film:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) २०२३ हे वर्ष खूपच खास ठरले होते. या वर्षात त्याचे एकापाठोपाठ ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि ते तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने फक्त देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई केली होती. 'पठान'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता 'पठान २' चित्रपट (Pathaan 2 Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा यांनी हात मिळवणी केली आहे.

शाहरुख खानने २०२३ मध्ये YRF स्पाय युनिव्हर्सच्या 'पठान' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर जोरदार पुनरागमन केले. या चित्रपटात सलमान खाननेही कॅमिओ केला होता. 'पठान'नंतर सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान एका छोट्या भूमिकेत दिसला होता. पण आता YRF स्पाय युनिव्हर्सच्या आगामी 'पठान वर्सेस टायगर' या चित्रपटात दोन्ही स्टार्स एकत्र येत असल्याच्या बातम्या येत होत्या. अशामध्ये आता 'पठान २' ची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान पुन्हा भेटीला येणार आहे.

शाहरुख खानचा 'पठान' रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. शाहरुख खानच्या 'पठान २' चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या 'पठान २' या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२४ पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. 'पठान व्हर्सेस टायगर' या चित्रपटाचा पाया रचला जाणार आहे.

Pathaan 2 Movie
Don 3 Movie: 'डॉन 3'मध्ये कियारा आडवाणीची एन्ट्री, रणवीर सिंगसोबत पहिल्यांदाच स्क्रीन करणार शेअर; VIDEO व्हायरल

दरम्यान, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'पठान' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई केली होती. तर जगभरामध्ये १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमही केले. या चित्रपटात जॉन अब्राहम विलनच्या भूमिकेत दिसला होता.

Pathaan 2 Movie
जो होगा देखा जाएगा! मानुषी छिल्लरच्या 'Operation Valentine'चा धमाकेदार ट्रेलर आऊट, सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com