Don 3 Movie: 'डॉन 3'मध्ये कियारा आडवाणीची एन्ट्री, रणवीर सिंगसोबत पहिल्यांदाच स्क्रीन करणार शेअर; VIDEO व्हायरल

Kiara Advani In Don 3 Movie: 'डॉन 3'चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबतच्या अभिनेत्रीच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. कियारा आडवाणी (Kiara Advani) या चित्रपटामध्ये दिसणार असून तिच्या नावाची ऑफिशियल अनाऊंसमेंट झाली आहे.
Kiara Advani
Kiara AdvaniSaam Tv

Ranveer Singh And Kiara Advani:

सुपरहिट फ्रेंचाइजीच्या 'डॉन 3' चित्रपटाची (Don 3 Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रटाबाबत वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) कोणती अभिनेत्री दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर या चर्चांवरील पडदा आता उठला आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबतच्या अभिनेत्रीच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. कियारा आडवाणी (Kiara Advani) या चित्रपटामध्ये दिसणार असून तिच्या नावाची ऑफिशियल अनाऊंसमेंट झाली आहे.

फरहान अख्तरच्या 'डॉन 3' चित्रपटाशी संबंधित एकापाठोपाठ एक अपडेट्स समोर येत आहेत. सुरूवातीला शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंगने चित्रपटात एन्ट्री केल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. आता या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीने एन्ट्री घेतली आहे. 'डॉन 3' या चित्रपटात कियारा अडवाणीची एन्ट्री झाल्याचे नुकताच निर्मात्यांनी जाहीर केले. या चित्रपटाचा एक नवीन व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कियारा अडवाणीच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कियाराच्या एन्ट्रीनंतर तिचे चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणीचे नाव रणवीर सिंगच्या आगामी 'डॉन 3' चित्रपटाशी जोडले जात होते. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम लागले आहे. आता याबाबतची अधिकृत बातमीही समोर आली आहे. फरहान अख्तरच्या 'डॉन 3' चित्रपटात कियारा अडवाणीची एन्ट्री निश्चित झाली आहे. निर्मात्यांनी एक व्हिडिओ जारी करून याची घोषणा केली आहे. कियारा अडवाणीच्या या चित्रपटात एन्ट्री झाल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कियारा आडवाणीचे कौतुक होत आहे.

Kiara Advani
Rituraj Singh: प्रसिद्ध अभिनेता ऋतुराज सिंहचे निधन, रुग्णालयातून घरी येताना आला हार्ट अटॅक

'डॉन 3' चित्रपटात कियारा अडवाणीच्या एन्ट्रीनंतर ट्विटरवर याबाबत ट्रेंड सुरू झाला आहे. ट्विटरवर अनेक यूजर्स या भूमिकेसाठी कियारा अडवाणीचे अभिनंदन करताना दिसले. त्यामुळे अनेक युजर्स म्हणाले की, 'कियारा अडवाणी चित्रपटात काय आश्चर्य दाखवू शकते हे पाहावे लागेल.' फरहान अख्तरची फ्रेंचाइजी अमिताभ बच्चन यांचा क्लासिक ब्लॉकबस्टर 'डॉन' (१९७८) चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Kiara Advani
Rakul Preet-Jackky Wedding: लग्नामध्ये रकुल प्रीतला सरप्राईज देणार जॅकी भगनानी, होणाऱ्या पत्नीसाठी खूपच खास आहे हे गिफ्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com