जो होगा देखा जाएगा! मानुषी छिल्लरच्या 'Operation Valentine'चा धमाकेदार ट्रेलर आऊट, सत्य घटनेवर आधारित आहे चित्रपट

Operation Valentine Trailer Released: 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सलमान खान आणि राम चरण यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी दोघांनी देखील चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
Operation Valentine Trailer
Operation Valentine TrailerSaam Tv

Operation Valentine Trailer:

नुकताच एरिअल अॅक्शनवर बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) 'फायटर' चित्रपट (Fighter Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता एरिअल अॅक्शनवर आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने नाव 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' (Operation Valentine Movie) असं आहे.

या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि साऊथ अभिनेता वरुण तेज मुख्य भूमिकेत आहे. मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सध्या तिच्या आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या चित्रटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सलमान खान आणि राम चरण यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी दोघांनी देखील चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

मानुषी छिल्लरचा बहुप्रतिक्षित हिंदी आणि तेलुगू भाषेतील चित्रपट ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा ट्रेलर लाँच इव्हेंट आज हैदराबादमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'च्या ट्रेलरमध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ला कसा झाला हे दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये देशातील 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर आपल्या शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. ट्रेलरमध्ये वरुण तेज एअरफोर्स पायलट अर्जुन देवच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लरही अप्रतिम भूमिकेमध्ये दिसत आहे.

ट्रेलरची सुरूवात अर्जुन देवला एक भयानक स्वप्न पडते. त्यानंतर तो खडबडून उठतो. त्यानंतर जेव्हा तो पायलट होता तेव्हाचे त्याचे हवाई दलाचे जीवन दाखवले आहे. यासोबतच मानुषी छिल्लरही सोनलच्या भूमिकेत आहे. हे दोघेही इतर अधिकाऱ्यांसोबत देश वाचवण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. ट्रेलरमध्ये बरीच एरियल ॲक्शन दाखवण्यात आली आहे. यासोबतच वरुण तेज आणि मानुषी छिल्लर यांच्यातील रोमान्सही दाखवण्यात आला आहे.

Operation Valentine Trailer
Rakul Preet-Jackky Wedding: लग्नामध्ये रकुल प्रीतला सरप्राईज देणार जॅकी भगनानी, होणाऱ्या पत्नीसाठी खूपच खास आहे हे गिफ्ट

शक्ती प्रताप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. सोनी पिक्चर्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाइन हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण तेजचे कॅरेक्टर कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांच्याशी प्रेरित आहे. जे पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या हवाई हल्ल्याचा एक भाग होता. त्यांनी हवाई हल्ल्यात पाकिस्तानी F-16 विमान पाडले होते. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Operation Valentine Trailer
Don 3 Movie: 'डॉन 3'मध्ये कियारा आडवाणीची एन्ट्री, रणवीर सिंगसोबत पहिल्यांदाच स्क्रीन करणार शेअर; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com