मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे शिवसेनेत प्रवेश करणार; किरीट सोमय्यांचा मोठा दावा

Kirit Somaiya On Sanjay Pandey : संजय पांडे यांना येत्या दीड महिन्यात शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, असं मोठं विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Will join ShivSena Kirit Somaiya's big claim
Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Will join ShivSena Kirit Somaiya's big claimSaam Tv

मुंबई: आपल्या विरोधात बोगस एफआयआर दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्यावर केला होता. त्यावरूनच आता भाजपा आक्रमक झालं असून पक्षाचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. त्यापूर्वी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याबाबत आणखी एक मोठं विधान केलं आहे. संजय पांडे हे येत्या दीड महिन्यात शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा सोमय्यांनी केला आहे. (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Will join ShivSena Kirit Somaiya's big claim)

हे देखील पाहा -

संजय पांडे यांना येत्या दीड महिन्यात शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, असं मोठं विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या म्हणाले,"मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझा एफआयआर नोंदवून न घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांना येत्या दीड महिन्यामध्ये शिवसेनेत प्रवेश करायचा आहे. आम्ही लवकरच राज्यपालांची भेट घेत आहोत आणि गरज पडल्यास या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयातही जाऊ."

Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Will join ShivSena Kirit Somaiya's big claim
पुढील तीन महिन्यांत राज्यातील चेकपोस्ट बंद होणार? केंद्राचं राज्याला परिपत्रक

किरीट सोमय्या यांच्यासोबत आज गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, मंगल प्रसाद लोढा, सुनील राणे हे भाजपा नेतेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com