मुंबई: राज्यातील सर्व आरटीओ चेकपोस्ट बंद होणार असल्याची शक्यता आहे. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला तिसरे परिपत्रक (Circular) पाठवले आहे. तसेच परिवहन विभागाला (Department of Transportation) अहवाल सादर करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. सगळे कर ऑनलाईन झाल्यानंतर आता चेकपोस्टही बंद करण्याची तयारी सरकारने केली आहे. (Checkposts in the state will be closed in the next three months; Central Government Circular to State Government)
हे देखील पाहा -
केंद्र सरकारकडून (Central Government) आलेल्या तिसऱ्या परिपत्रकानंतर आता राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या (corruption) आरोपानंतर गृह विभागानं अभ्यास गटाची स्थापना केली आहे. तीन महिन्यांत या अभ्यास गटाला आपला अहवाल शासनाला द्यावा लागणार आहे. तसे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील चेकपोस्टबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके, म्हणजेच चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होती आणि त्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीत अभ्यास करुन एक अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर चेकपोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
अभ्यास गट नेमकं काय काय करणार?
अभ्यास गटाद्वारे चेकनाके बंद करण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अभ्यास करेल. त्याचप्रमाणे जर चेक पोस्टबंद करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची, याचाही अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील 3 महिन्यांत राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद होण्याची शक्यता आहे.
' या' अधिकाऱ्यांचा अभ्यास असेल गटामध्ये समावेश
गृह विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर अभ्यास गटात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल हा तयार केला जाणार आहे. तर इतर पाच सदस्यही या अभ्यास गटात सहभागी असतील. यात परिवहन उपायुक्त दिनकर मनवर, लेखा उपायुक्त तुळशीदास सोळंकी, परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचा समावेश असणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.